शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

खासगी रुग्णालयांकडून खाटांच्या माहितीची लपवाछपवी? बेड मॅनेजमेंटसाठी नेमलेले कर्मचारी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 01:43 IST

शहरातील कोरोना रूग्णांच्या झपाट्याने वाढत चाललेल्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने खासगी रुग्णालयांच्या खाटा ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देपालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी 

लक्ष्मण मोरे- 

पुणे : 'खासगी रुग्णालयातील नेमक्या खाटा पालिकेने ताब्यात घेतल्या आहेत?, त्या खाटांवर पालिकेचे टॅग लावण्यात आलेले नाहीत. आम्हाला आयसीयू अथवा कोरोना कक्षात जाऊच दिले जात नाही. डॅशबोर्डवर काय माहिती अपलोड केली जाते हे सुद्धा पाहू दिले जात नाही. मग आम्ही खाटांचे व्यवस्थापन कसे करायचे?' ही उद्विग्नता सर्वसामान्य नागरिकांची नव्हे तर खुद्द पालिकेच्याच अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे डॅशबोर्डवर दर्शविली जाणारी माहिती खरी असते का याविषयी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. 

शहरातील कोरोना रूग्णांच्या झपाट्याने वाढत चाललेल्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने खासगी रुग्णालयांच्या खाटा ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. खाटांच्या व्यवस्थापनासाठी विविध रुग्णालयांमध्ये पालिकेने अधिकारी नेमले आहेत. परंतु, या कर्मचाऱ्यांना खाटांची माहिती दिली जात नाही की पालिकेसाठी कोणत्या खाटा राखीव आहेत हे सुद्धा सांगितले जात नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवूनही त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे काही अधिकाऱ्यांनी 'लोकमत'सोबत बोलताना सांगितले. 

पालिकेने खासगी रुग्णालयांमध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांचा स्वतंत्र 'व्हॉट्सऍप' ग्रुप केलेला आहे. या ग्रुपवर याबाबतच्या अडचणी आणि सुचना टाकल्या जातात. रुग्णालयांकडून या अधिकाऱ्यांना नीट वागणूक दिली जात नसल्याच्याही तक्रारी आहेत. तसेच, पालिकेने ताब्यात घेतलेल्या खाटांना टॅग नाहीत, नेमक्या कोणत्या खाटा राखीव याचीही माहिती पालिका अधिकाऱ्यांना दिली जात नाही. कोविड वॉर्डमध्ये जाऊ दिले जात नाही. डॅशबोर्डवर माहिती भरण्याचे कामही रुग्णालयाचेच कर्मचारी करीत आहेत. त्यामुळे नेमकी काय माहिती भरली जाते हे सुद्धा काहीजणांना समजत नाही. शहरात नागरिक कोरोना रूग्णांच्या खाटांसाठी वणवण फिरत आहेत. रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत असल्यामुळे सर्वच प्रकारच्या खाटांसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. खासगी रुग्णालयांकडून पालिका प्रशासनाला  दादच देण्यात येत नसून परस्पर खाटा भरल्या जात आहेत. ऑक्सिज, व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभाग यांच्यामध्ये एकही बेड शिल्लक नसून ५० ते ६० रुग्णांची प्रतिक्षा यादी आहे.पालिकेची हेल्पलाईन सुविधा केवळ खाटा शिल्लक नाहोत हे सांगण्यासाठीच आहे की काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा नियंत्रीत केल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याचा फारसा उपयोग होत नाही. खासगी रुग्णालयांकडून परस्पर खाटा भरल्या जात असल्याचेही या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.-----//अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे रुग्णालयांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारी केल्यास त्यांनाच सामंजस्याने घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे कोण दाखल होतंय, कोण उपचार घेऊन घरी जातंय हेच समजत नाही. पैसे असतील तर उपचार अन्यथा 'वेटिंग' अशी अवस्था असल्याने हे अधिकारी सुद्धा हतबल झाले आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका