शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बीड पालकमंत्रिपदाचा चेंडू अजित पवारांनी फडणवीसांच्या कोर्टात ढकलला…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 19:44 IST

अजित पवार : आम्ही त्यांच्या एकाही खासदाराशी संपर्क साधलेला नाही

पुणे :बीडमधील खून प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्याची न्यायालयीन, एसआयटी, तसेच सीआयडी, अशा ३ स्तरांवर चौकशी सुरू आहे. कोणतेही पक्षीय राजकारण न आणता हा तपास होईल, दोषींना शासन होईल, कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या एकाही खासदाराबरोबर आम्ही संपर्क साधलेला नाही, असे ते म्हणाले.पवार यांनी गुरुवारी सकाळपासूनच पुण्यात बैठकांचा धडाका लावला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी सकाळी ०६:३० वाजता बैठक घेतली. त्यानंतर विश्रामगृहात विविध सरकारी कार्यालयांच्या बैठका घेतल्या. या बैठकांनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी बीड प्रकरणावर भाष्य केले.ते म्हणाले, मंत्री मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. मात्र, कोणीही कोणावर कसलेही आरोप केले, तर लगेच संबंधिताला दोषी म्हणता येणार नाही. ते प्रकरण गंभीर आहे. त्याची तीन स्तरांवर चौकशी सुरू आहे. कोणी आरोप करत असेल, तर त्यांनी पुरावे समोर आणावेत. मुख्यमंत्र्यांबरोबर यासंदर्भात बोललो आहे. तेही माझ्याच विचारांचे आहेत. पक्षीय राजकारण न आणता कोणी कितीही मोठा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही.बड़ी मुन्नी कोण? हे मला का विचारता? ज्यांनी ते नाव घेतले त्यांनाच विचारा. अशा फालतू गोष्टींना मी काहीही किंमत देत नाही, असे पवार म्हणाले. आमच्या पक्षातील कोणीही दुसऱ्या पक्षातील कोणत्याही खासदाराबरोबर संपर्क साधलेला नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तसे स्पष्ट सांगितले आहे. इतकेच नाही, तर त्यांचे खासदार नीलेश लंके व अन्य कोणीही आमच्याबरोबर बोललेले नाही, असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा. त्यांचे चिन्ह वेगळे, माझे चिन्ह वेगळे, असे पवार यांनी ठामपणे सांगितले. आमच्या पक्षाला जनतेने मते दिली. आमचे लोक निवडून दिले. त्यामुळे आता काम करण्याची जबाबदारी आमची आहे. ते आम्ही करतो आहोत, असे ते म्हणाले. बीडचे पालकमंत्रिपद तुम्ही घेणार का? या प्रश्नावर अजित पवार यांनी, तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, ते ३६ जिल्ह्यांची जबाबदारी वाटून देतील, त्याप्रमाणे पालकमंत्रिपद दिले जाईल, असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडे