शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

हैद्राबादसारखा सिग्नल पुण्यात हाेणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 19:44 IST

हैद्राबादप्रमाणे डिजीटल सिग्नल यंत्रणा पुण्यात राबवता येईल का याबाबत वाहतूक शाखेकडून चाचपणी सुरु आहे.

पुणे : सध्या साेशल मीडियावर हैद्राबाद येथील केबीआर पार्क जंक्शन या चाैकात लावण्यात आलेल्या रिफलेक्टरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल हाेत आहे. या चाैकामध्ये सिग्नल यंत्रणा रिफलेक्टर बसवून हाताळण्यात येत आहे. प्रायाेगिक तत्त्वावर हा प्रयाेग तिथे करण्यात येत आहे. साेशल मीडियावर व्हायरल हाेणारा व्हिडीओ पाहून हैद्राबादच्या कंपनीशी पुणे वाहतूक शाखेने संपर्क केला आहे. पुण्यातही असा प्रयाेग शक्य आहे का याबाबत विचार सुरु आहे. 

पुण्याच्या वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस जटील हाेत चालली आहे. सातत्याने वाहनांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे रस्ते अपुरे पडत आहेत. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक काेंडीत भर पडत आहे. यावर उपाय म्हणून पुणे वाहतूक शाखेकडून विविध उपाय केले जात आहेत. त्यात नियमभंग कऱणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. अशातच हैद्राबाद सारखा उपक्रम पुण्यात राबविता येईल का याबाबत पुणे वाहतूक शाखेकडून चाचपणी करण्यात येत आहे.  हैदराबाद शहरातील केबीआर जंक्शन चौकामध्ये नूकताच डिजीटल पध्दतीच्या सिग्नल यंत्रणेचा प्रयोग सुरु आहे. चौकातील झेब्रा क्रॉसिंगवर रिफ्लेक्टरच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा हाताळण्यात येत आहे. ही यंत्रणा एका आयटी कंपनीच्या माध्यमातून सुुरु करण्यात आली असून याचा वाहनचालकांबरोबरच रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना फायदा होत आहे. सध्याच्या सिग्नलप्रमाणेच ठरावीक सेकंदाने या रिफ्लेक्टरचा कलर बदलत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांना याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलिसांकडून एक नवीन प्रयोग करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने हैदराबाद पोलिसांमार्फत सिग्नल यंत्रणा बसवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला आहे. तसेच, कंपनीतील अधिकाऱ्यांशी मेलव्दारे संपर्क साधून पुण्यामध्ये अशाप्रकारे सादरीकरण करण्याविषयी विनंती करण्यात आली आहे. पोलिसांच्या मागणीला प्रतिसाद देत आज (दि.८) कंपनीतील अधिकारी पोलिसांची भेट घेणार असल्याची माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. ही प्रक्रिया अगदीच प्राथमिक टप्प्यात असून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेत पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPuneपुणेTrafficवाहतूक कोंडी