शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षाच्या ढासळत्या स्थितीवर विचारविनिमय होणार का? राज्यभरातून किमान २५० पदाधिकारी येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:29 IST

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही तज्ञांना, अधिकारी व्यक्तींना शिबिरात बोलण्यासाठी म्हणून खास निमंत्रित करण्यात आले आहे

पुणे: काँग्रेसचे राज्यस्तरीय निवासी चिंतन शिबिर पुण्यात ११ व १२ ऑगस्टला खडकवासला इथे होत आहे. पक्षाच्या ढासळत्या राजकीय स्थितीवर या शिबिरात चिंतन होणार का? त्यावर काही उपाय करण्याबाबत विचारविनिमय होणार का? असा प्रश्न अनेक वर्षांनी होत असलेल्या या शिबिराविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील व अन्य काही काँग्रेस नेत्यांच्या शिबिरात अशी शिबिरे होत असत. काँग्रेसची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची ती परंपराच होती. स्वातंत्र्यानंतरही ती बराच काळ सुरू होती. मात्र, पुढे ती खंडित झाली व नंतर तर बंदच झाली. पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या शिबिर परंपरेतील आहेत. त्यामुळेच त्यांनी ही खंडित परंपरा परत सुरू केली असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांच्या या शिबिराला पक्षाचे राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी निमंत्रित करण्यात आले आहेत.

किमान २५० ते ३०० जण या शिबिराला उपस्थित असतील अशी माहिती देण्यात आली. पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण यांच्याकडे या शिबिराचे यजमानपद देण्यात आले आहे. येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना शिबिर स्थळी आण्यापासून ते त्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यासाठी पक्षाने समित्या स्थापन केल्या आहेत. पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी त्यासाठी सोमवारी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची काँग्रेसभवनावर खास बैठक घेतली. त्यात त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही तज्ञांना, अधिकारी व्यक्तींना शिबिरात बोलण्यासाठी म्हणून खास निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचेही नियोजन केले जात आहेत. काँग्रेसचा इतिहास, ध्येेयधोरणे, विचारधारा याविषयी शिबिरात उहापोह होईल.

अशा शिबिरांमधून पक्ष पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की होते. निष्ठा पक्क्या होतात. सरकारच्या चुकीच्या निर्णयांचे विश्लेषण करण्याची दृष्टी तयार होते. राजकारण म्हणजे केवळ पदांचा, सत्तेचा खेळ नाही तर समाज परिवर्तनाचे ते एक साधन आहे ही बाब मनावर बिंबते. यापुढेही वेगवेगळ्या स्तरावरील कार्यकर्त्यांसाठी अशा शिबिरांचे स्थानिक पातळीवर आयोजन केले जाईल.- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळRahul Gandhiराहुल गांधी