शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जनता सरकारला जागा दाखवेल - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 02:16 IST

चेतन तुपे यांच्या सत्कार प्रसंगी शासनाच्या धोरणावर केली चौफेर टीका

हडपसर : भाजपा सरकारने ‘अच्छे दिन’च्या गोंडस नावाखाली जनतेची दिशाभूल केली आहे. या सरकारने महागाई वाढवली व सामान्य लोकांचे जीवन अडचणीत आणले आहे. या सरकारच्या विरोधात महाराष्ट्रात जनता रस्त्यावर उतरून त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयात पालिकेतील विरोधीपक्ष नेतेपदी व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी चेतन तुपे यांची निवड झाल्याबद्दल हडपसर ग्रामस्थ सत्कार-समिती आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात विधानसभा विरोधीपक्ष नेते मुंडे बोलत होते. या वेळी माजी आमदार जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पक्षाचे जालिंदर कामठे, सरचिटणीस राजलक्ष्मी भोसले, मंगलदास बांदल, कैलास कोद्रे, वासंती काकडे, संगीता घुले, रतन काळे यासह या भागातील राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक व पक्षांचे पदाधिकारी यासह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कारला उत्तर देताना शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की, जातियवादी शक्तीच्या तावडीतून मुक्त करणे हेच उद्दिष्ट आहे. इथल्या सामान्य जनतेला राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करीन यासाठी आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांसह मला ताकद द्यावी. असे सांगितले. तर, कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास कोद्रे यांनी सांगितले की, पक्षात नवतरुणांना संधी आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वसात घेतील.या वेळी राजलक्ष्मी भोसले, जालिंदर कामठे, सुरेश घुले व राहुल शेवाळे आदींचा सत्कार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश वैराळकर यांनी व आभार डॉ. अमित तुपे यांनी मानले.धर्माच्या नावावर दंगली घडविणारे सरकारपुढे मुंढे म्हणाले की, सध्या सरकारच्या विरोधात सामान्य माणसांच्या मनात चीड आहे. हे सरकार शोषण करणारे आहे. या सरकारने माणसा-माणसांत धर्माच्या नावावर दंगे लावून अस्थिरता माजविण्याचे काम केले. दिल्लीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना जाळण्यापर्यंत मजल जाते. हे खऱ्या अर्थाने गरीब-कामगाराला न्याय्य हक्कापासून गुलाम बनविण्याचे षडयंत्र भाजपा सरकारचे आहे. या विरोधात राष्ट्रवादी पक्षाला काम करायचे आहे. यासाठी पुण्याच्या शहराध्यक्षपदी चेतन तुपे यांची निवड केली. आगामी काळात सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाची ताकद मजबुत करा, असे आवाहन या वेळी केले.

टॅग्स :PuneपुणेDhananjay Mundeधनंजय मुंडे