शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Narendra Modi Pune Visit: नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी पवार, ठाकरे उपस्थित राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 13:45 IST

पुण्यात सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुण्यात येणार आहेत. सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच पुणे दौऱ्यात ज्या मार्गाने मोदी जाणार आहेत. तेथील रस्ते दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्ते स्वच्छ करणे, ओव्हर हेड केबल काढण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणेकडून कार्यात आली आहेत.

महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा मेट्रो प्रवास व त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर कोथरूड येथील एमआयटी कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधानांची सभा व अन्य ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रम होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार उदयनराजे भोसले, जपानचे भारतातील राजदूत सातोशी सुझुकी, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव तसेच राज्याचे मुख्य सचिवांसह इतर उच्चपदस्थ अधिकारी, 'महामेट्रो'चे ब्रिजेश दीक्षित, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, शहरातील सर्व खासदार, आमदार यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सुरु असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार कि नाही ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्याकडून अद्याप काहीच कळवण्यात आलेले नाही.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौरा६ मार्च

- सकाळी ११ वाजता लोहगाव विमानतळावर आगमन- हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय मैदान- पुणे महापालिका भवन येथे शिवाजी महाराज पुतळ्याचे उद्घाटन- गरवारे मेट्रो उदघाटन - मेट्रोने आनंदनगर पर्यंत प्रवास- एमआयटी कॉलेज मैदान येथे जाहीर सभा- हेलिकॉप्टरने लव्हळे सिंबायोसिस कॉलेज येथे भेट - दुपारी २ वाजता दिल्लीकडे रवाना 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी