मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही दिवसापूर्वी पुण्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेते रमेश परदेशी यांना सुनावल्याची चर्चा रंगली होती. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष असलेले परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आरएसएसच्या संचालनाचा फोटो पोस्ट केला. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी त्यांना कार्यकर्त्यांसमोरच सुनावले. राजकीय वर्तुळात याची चर्चा झाली होती. दरम्यान, आता रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आज रमेश परदेशी यांनी एक सूचक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये संघाच्या गणवेशातील फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये, 'मी माझ्या विचारांसोबत राष्ट्रप्रथम ..', अशी कॅप्शन लिहिली आहे. या पोस्टमुळे आता परदेशी हे भाजपामध्ये करणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज ठाकरेंनी रमेश परदेशी यांना सुनावले होते
काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी बैठकीत कामगिरीबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. पुणे शहरातील संकल्प हॉलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला पुण्यातील सर्व शाखा अध्यक्ष, पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष रमेश परदेशी यांना त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून फटकारले. रमेश परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. संघाचा कट्टर कार्यकर्ता अशा आशयाचा हा फोटो होता. हाच फोटो राज ठाकरेंनी बघितल्याने त्यांनी परदेशी यांना कार्यकर्त्यांच्या समोर झापलं. “छातीठोकपणे सांगतोस की मी संघाचा कार्यकर्ता आहे. टाईमपास कशाला करतो, एकाच ठिकाणी कुठे तरी राहा,” असे म्हणत राज ठाकरेंनी मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी यांना चांगलेच सुनावले.
Web Summary : Rumors swirl around Ramesh Pardeshi, 'Mulshi Pattern' fame, potentially joining BJP after Raj Thackeray criticized his RSS post. Pardeshi's recent pro-RSS social media activity fuels speculation following Thackeray's disapproval.
Web Summary : राज ठाकरे द्वारा आरएसएस पोस्ट पर आलोचना के बाद, 'मुळशी पैटर्न' फेम रमेश परदेशी के भाजपा में शामिल होने की अफवाहें। ठाकरे की अस्वीकृति के बाद परदेशी की हालिया आरएसएस समर्थक सोशल मीडिया गतिविधि अटकलों को बढ़ावा दे रही है।