शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासूनचा रिक्षाबंद होणार यशस्वी?

By admin | Updated: June 17, 2015 01:10 IST

राज्य सरकारने वारंवार आश्वासने देऊनही रिक्षाचालकांचे प्रश्न सोडविलेले नाहीत. सरकार रिक्षाचालकांची फसवणूक करीत आहे.

पिंपरी : राज्य सरकारने वारंवार आश्वासने देऊनही रिक्षाचालकांचे प्रश्न सोडविलेले नाहीत. सरकार रिक्षाचालकांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पंचवीस हजार रिक्षाचालक-मालक बंदमध्ये सहभागी होणार आहेत. ठोस आश्वासन मिळेपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार रिक्षाचालकांनी केला आहे.अ‍ॅटो रिक्षाचालक-मालक संघटना, संयुक्त कृती समिती, महाराष्ट्रच्या वतीने रिक्षाचालक-मालकांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राज्यव्यापी रिक्षा बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दोन वेळा रिक्षा बंदचा इशारा संघटनांनी दिला होता. मात्र, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने रिक्षा संघटनांनी बंदचा पवित्रा घेतला आहे.

शासकीय पातळीवरून दबावरिक्षाचालकांनी एकदिवसीय बंद जाहीर केल्याने राज्य सरकारकडून हा बंद होऊ नये, म्हणून दबाव टाकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, ‘ठोस निर्णय घेतल्याशिवाय रिक्षा बंद मागे घेतला जाणार नाही. महाराष्ट्र सरकार रिक्षा व्यवसाय संपविण्याचा प्रयत्न करत असून, या विरोधात रिक्षाचालक-मालक एकजूट होऊन तीव्र विरोध करतील. संप होणारच, अशी भूमिका संघटनांची आहे.

१५ लाख चालक बंदमध्ये सहभागीपिंपरी-चिंचवडसह मुंबई, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, सोलापूर, सातारा अशा महाराष्ट्रातील पंधरा लाख रिक्षाचालक-मालक सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवड परिसरात पंचवीस हजार रिक्षाचालक असून, रिक्षावर सुमारे सव्वा लाख लोकांचे जीवन अवलंबून आहे. रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. विविध मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे. त्यात रिपब्लिकन आघाडी, महाराष्ट्र रिक्षा सेना, शिवनेरी रिक्षा सेना, पुणे रिक्षा फेडरेशन, पुणे कॅन्टोन्मेंट रिक्षा फेडरेशन, आशीर्वाद रिक्षा संघटनांसह सुमारे अठरा संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत. सरकारकडून चर्चेसाठी बोलावणे येत आहे. मात्र, आता चर्चा नको, निर्णय हवा आहे. दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करू. - बाबा कांबळे सरचिटणीस, रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत....अशा आहेत मागण्या -चारचाकी कॅबच्या वतीने प्रवासी वाहतूक करण्यात येत असून, संबंधित कंपन्यांवर बंदी घालावी. -हकीम समितीने सुचविलेल्या शिफारशी रद्द करू नये.-केंद्रीय सुरक्षा विधेयक केंद्र सरकारने तयार केले असून, या विधेयकास मंजुरी देऊ नये.-आॅटो रिक्षाचालक-मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे.-मीटर कोलोब्रेशन करण्याचे काम वजनमापे खात्याकडे दिले आहे. ही पद्धत बंद करावी.-पुणे शहरातील मध्यरात्रीच्या भाड्यात २५ टक्केऐवजी पूर्वीप्रमाणे ५० टक्के वाढ करावी.-उशिरा परवाने वेळेत नूतनीकरण न केलेले दंड भरून नूतनीकरण करण्यात यावेत.-सर्व आॅटो रिक्षामालक-चालकांना सार्वजनिक सेवक म्हणून दर्जा द्यावा. -अवैध वाहतुकीस आळा घालण्यासाठी आॅटो रिक्षामालक-चालक संघटनांनी सरकार व पोलीस खात्याला वारंवार पत्रे पाठविली आहेत. परंतु, प्रचंड प्रमाणात हप्ते घेऊन अवैध वाहतूक चालविली जात आहे. ती बंद करण्यात यावी .-आॅटो रिक्षा फिटनेस सर्टिफिकेटच्या नूतनीकरणास विलंब झाल्यास आकारणारा हजारोंचा दंड त्वरित रद्द करावा.----------------------------पिंपरी : रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी रिक्षांचा संप पुकारला जातो. रिक्षाचालक, मालकांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना आहेत. त्यांची या संपात एकजूट दिसून येत नाही. काही संघटनांनी संप पुकारायचा, तर अन्य संघटनांनी त्यात सहभाग न नोंदविता, विरोधी भूमिका घ्यायची, असे चित्र वेळोवेळी दिसून येते. अशीच स्थिती बुधवारी १७ जूनला पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी रिक्षा बंद आंदोलनाची आहे. या निमित्ताने रिक्षा पंचायत पुणे, पिंपरी-चिंचवडचे निमंत्रक नितीन पवार यांच्याशी चर्चा केली असता, दिशाभूल करणारी आंदोलने नकोत, ठोस कृतिशील कार्यक्रम असतील, तर सहभागी होण्याची आमची तयारी आहे, अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी व्यक्त केली.राज्यव्यापी रिक्षा बंदमध्ये सहभागी होण्याबद्दलची आपली भूमिका काय आहे, असे विचारले असता, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालील संघटनेत काम करणारे पवार म्हणाले, ‘‘१७ जूनच्या संपात आम्ही सहभागी होणार नाही. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी हाकीम समितीच्या शिफारसी रद्द करण्याची घोषणा केली. त्या रद्द होऊ नयेत, यासाठी रिक्षा बंद आंदोलन केले जाणार आहे. मुळात हाकीम समितीने रिक्षा आणि टॅक्सीचे भाडेदर निश्चितीबाबत शिफारशी केल्या होत्या. मुंबईतील रिक्षा, टॅक्सी व्यवसाय केंद्रित धरून केलेल्या शिफारशी राज्यभर अमलातही येत नव्हत्या. त्यामुळे त्या रद्द होण्याचा रिक्षाचालकांवर काही परिणाम होणार नाही, हे माहीत असल्याने आम्ही आंदोलनात उतरणार नाही. शुद्ध हेतूने रिक्षाचालकांसाठी काम करण्याची तयारी असेल, तर निश्चितपणे त्यात एकजूट पाहावयास मिळेल.(प्रतिनिधी)सार्वजनिक वाहतूक सेवेत मोलाचे योगदान देणारा हा रिक्षा व्यवसाय आहे. असे असताना रिक्षाचालक आणि मालकांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. त्यांना सार्वजनिक परिवहन सेवक मानले जावे. सामाजिक सुरक्षा कायदा लागू करून त्यांना शासनाकडून विविध सवलती मिळाव्यात. या मतांशी आम्हीही सहमत आहोत. त्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. परंतु, रिक्षा संघटनांचे काही नेते त्यांच्या सोयीनुसार निर्णय घेतात. अन्य रिक्षा संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांबद्दल आदर आहे. परंतु नेत्यांच्या नावावर आपली दुकानदारी चालविणाऱ्यांच्या कृतीला आमचा विरोध आहे.- नितीन पवार, रिक्षा पंचायत निमंत्रक