शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

फुकटची बिर्याणी पडणार डीसीपीला महागात? गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 11:33 AM

Pune News: या संभाषणाची ध्वनिफित समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या फुकटात बिर्याणी प्रकरणाची गंभीर दखल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुणे :  परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला एका उपाहारगृहातून बिर्याणी आणण्यास सांगून आपल्याच हद्दीतले उपाहारगृह आहे ना? मग उपाहारगृहचालकाला पैसे कशाला द्यायचे, अशी विचारणा केली. या संभाषणाची ध्वनिफित समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या फुकटात बिर्याणी प्रकरणाची गंभीर दखल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.

नारनवरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला टिळक रस्त्यावरील उपाहारगृहातून बिर्याणी आणण्यास सांगितले. या कर्मचाऱ्याने, ‘‘मॅडम, साजूक तुपातील बिर्याणी आणू का?’’ असे विचारले. ‘‘फार स्पायसी नको. जरा तोंडाला टेस्टपण आली पाहिजे. त्यामुळे प्रॉन्सपण आण.’’ असे सांगितले. यावर  बिर्याणीचे पैसे कसे देणार, असे नारनवरे यांनी विचारल्यावर, उपाहारगृहात पैसे देतो, असे त्याने सांगितले. तेव्हा ‘हद्दीतील उपाहारगृहचालकाला पैसे कशाला द्यायचे.’, अशी विचारणा नारनवरे यांनी केली. संबंधित कर्मचारी आणि उपायुक्तांमधील संभाषणाची ध्वनीफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली.  त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, ध्वनिफितीमध्ये तांत्रिक छेडछाड केली असल्याचा दावा पोलीस उपायुक्त नारनवरे यांनी केला आहे. ध्वनीफित खोडसाळपणे प्रसारित केली असून,  त्यात काही तांत्रिक बदल किंवा छेडछाड करण्यात आली (मॉर्फ)   आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी हप्तेखोरी करत होता. त्याच्यावर कारवाई केल्याने गैरप्रकारांना आळा बसला होता. माझ्यावर रोष होता. माझी  बदली व्हावी तसेच माझ्यावर कारवाई होऊन मी अडचणीत यावे, या हेतूने ध्वनिफित प्रसारित केली असल्याचा दावा उपायुक्त नारनवरे यांनी केला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस