शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील कॅन्सर रुग्णालयासह सुपर स्पेशालिटीसाठी पाठपुरावा करणार - मंत्री माधुरी मिसाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 10:26 IST

नवीन कॅन्सर रुग्णालयासह सुपर स्पेशालिटीसाठी रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह बांधकाम, साधनसामग्री, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देणार

पुणे: शहरातील पहिल्या नवीन कॅन्सर रुग्णालयासह ससूनच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. ससून रुग्णालयाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता लागणारी यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि सर्वसामान्यांना आवश्यक सेवासुविधा मिळाव्यात, यासाठी आग्रही असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. त्यांनी शुक्रवारी (दि.२७) बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन ससून सर्वोपचार रुग्णालय व बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजाचा आढावा घेतला.

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच बी. जे. महाविद्यालयास भेट दिली. यावेळी बैठकीनंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. या आढावा बैठकीस ससून रुग्णालय व बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, भाजपचे आमदार हेमंत रासने, राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे, महाविद्यालयाच्या विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

आढाबा बैठकीविषयी बोलताना मंत्री मिसाळ यांनी नवीन कॅन्सर रुग्णालयासह सुपर स्पेशालिटीसाठी रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह बांधकाम, साधनसामग्री, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देणार आहे. यासह केंद्र व राज्य सरकाच्या योजनांमधून ससून रुग्णालयाला नेमके काय मिळाले, काय त्रुटी आहेत ? कोणत्या गोष्टींची आवश्यक प्रतीपूर्ती झाली, भविष्यातील रुग्णालयाच्या काय गरजा आहेत. या सर्व गोष्टींचा आढावा घेतला असून ससूनवरील रुग्णांचा वाढता भार लक्षात घेता सध्या उपलब्ध आसलेल्या सेवासुविधा कमी पडत आहेत. याबाबत राज्य सरकारकडे विविध प्रस्ताव ससून रुग्णालयाकडून पाठविण्यात आले आहेत. सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या प्रतीच्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या दर्जाचे वसतिगृह, वर्गखोल्या रुग्णालयासाठी वाढीव खाटा, नवीन एमआरआय, सीटीस्कॅन व कॅथेलॅब मशीन उपलब्ध करून देण्यासह विभागवार साहित्य व सेवासुविधांच्या प्रस्तावास मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दिव्यांग रुग्णांच्या सर्व सुविधांसह न्यायवैद्यकीय विभागाकडील तक्रारी, निवासी डाॅक्टरांच्या सेवासुविधांसाठी नवीन इमारत प्रस्तावित असून जे काही प्रस्ताव रुग्णालय व महाविद्यालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आले आहेत त्याबाबत प्राधान्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी शहरातील नवीन ४०० खाटांच्या कॅन्सर रुग्णालयासाठी ८६० कोटी, तर सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी ६३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला असल्याचे सांगितले. कॅन्सर रुग्णालयासाठी एमएसआरडीसीची जागा प्रस्तावित असून त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबरोबरच नवीन एमआरआय मशीनसाठी २७ कोटी, कॅथेलॅब मशीनसाठी १७ कोटी, सीटी स्कॅन मशीनसाठी ७.५ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. रुग्णालयात प्रथम वर्ग कर्मचाऱ्यांसह चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची एकूण १०९७ पदे रिक्त असून ही पदे तातडीने भरण्याबाबतही प्रस्ताव पाठविला आहे. यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ३५४ पदे खासगी संस्थेमार्फत भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMadhuri Misalमाधुरी मिसाळsasoon hospitalससून हॉस्पिटलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcancerकर्करोगdoctorडॉक्टरMahayutiमहायुती