पतीचे हात-पाय बांधून पत्नीने केला चाकूने वार, भोसरीतील धक्कादायक घटना

By रोशन मोरे | Updated: September 18, 2023 17:23 IST2023-09-18T17:23:48+5:302023-09-18T17:23:58+5:30

पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.

Wife tied husband's hands and feet and stabbed him with a knife, a shocking incident in Bhosari | पतीचे हात-पाय बांधून पत्नीने केला चाकूने वार, भोसरीतील धक्कादायक घटना

पतीचे हात-पाय बांधून पत्नीने केला चाकूने वार, भोसरीतील धक्कादायक घटना

पिंपरी : पाय हालवू नको असे पती म्हटला म्हणून पत्नीने पतीचे हात पाय रस्सीने बांधले. त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून खून करण्याच्या प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि.१६) रात्री साडेअकराच्या सुमारास भोसरी येथे घडली. या प्रकरणी पतीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पती व त्याची पत्नी हे घरामध्ये गप्पा मारत बसले होते. पत्नी पाय हालवत असल्याने पाय हालवू नको म्हणून पतीने सांगितले. त्यावर मी तुमचे हात पाय बांधत तुम्ही पाय न हालवता बसून दाखवा, असे म्हटले. पतीने होकार दिल्यावर पत्नीने रस्सी आणून पतीचे हात-पाय घट्ट बांधले. त्यानंतर त्याच्या तोंडाला चिकट टेप लावला. तसेच कपड्याने पतीचे डोळे झाकून गळ्यावर हातावर चाकूने मारून गंभीर जखमी केले.

...‘तो’ राग काढला-

पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होता. त्यांचे लग्न सात महिन्यांपुर्वीच झाले आहे. पत्नी रागाने माहेरी निघून गेली होती. त्यावेळी तिच्या माहेरी पती तसेच सासु सासरे आले होते. ते बैठकीमध्ये तिला आणि तिच्या वडिलांना खुप काही बोलले. त्यामुळे तिचे वडील बैठकीतच रडले. याच राग पत्नीच्या डोक्यात होता. त्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत.

Web Title: Wife tied husband's hands and feet and stabbed him with a knife, a shocking incident in Bhosari