Pune: मेहुण्याला पैसे परत मागितल्याच्या रागातून बायकोने नवऱ्यावर फेकले उकळलेले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 09:37 IST2023-07-15T09:35:57+5:302023-07-15T09:37:57+5:30
या घटनेत पती जवळपास ५० टक्के भाजला असून...

Pune: मेहुण्याला पैसे परत मागितल्याच्या रागातून बायकोने नवऱ्यावर फेकले उकळलेले पाणी
पुणे : मेहुण्याला उसने दिलेले २ लाख ४० हजार रुपये परत मागितल्याच्या रागातून एका महिलेने आपल्या नवऱ्यावरच गरम पाणी फेकले. असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिक माहितीनुसार, गुरुवारी (दि. १३) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पती महादेव जाधव (३०, रा. शिवणे) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. महादेव आणि त्यांची पत्नी हे दोघेही शिवणे भागात भाजीपाला विक्रीचे काम करतात.
महादेव यांनी काही दिवसांपूर्वी मेहुण्याला २ लाख ४० हजार रुपये उसने दिले होते. हे पैसे परत मागण्याच्या मुद्यावरून पती-पत्नीत वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी महादेव जाधव झोपेत असताना पत्नीने त्यांच्या अंगावर गरम उकळते पाणी टाकले. त्यात महादेव जाधव ५० टक्के भाजले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रमेश बाबर करत आहेत.