शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पतीला मारले अन् तिला न्यायालयाने झापले.. ..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 12:30 IST

पीडीत पती एका खासगी कंपनीत काम करत असून पत्नी निवृत्त शिक्षिका आहे. त्यांना 16 वर्षांची मुलगी आहे...

ठळक मुद्देमारहाण न करण्याची न्यायालयाकडून पत्नीला तंबी पतीच्या डोक्यात गरम कुकर मारण्याचा प्रयत्न : घरगुती हिंसाचाराचा गंभीर प्रकारदीड वर्षांपूर्वी पत्नीने पोटगीकरिता केला होता दावा दाखल महिलांद्वारे पतीचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग

पुणे :  पावसाने झोडपलं आणि नव-यानं मारलं तर तक्रार कुणाकडे करायची.? अशी म्हण प्रचलित आहे. नव-याकडून बायकोला मारहाण, त्रास, अत्याचाराच्या घटना सातत्याने ऐकायला मिळतात. पण पुण्यात चक्क पत्नीनेच पतीला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे.  चक्क पत्नीने पतीच्या डोक्यावर गरम कुकर मारण्याचा प्रयत्न केल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मतकर यांनी पत्नीच्या विरुध्द हिंसाचार न करण्याचे प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत.   पतीच्या अत्याचारापासून संरक्षण मिळावे म्हणून पत्नीने न्यायालयात धाव घेतल्याचे प्रकार सर्रास घडतात. त्यावर पत्नीच्या बाजूने निकाल लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, या प्रकरणात न्यायालयाने पत्नीला फटकारत पतीलाच संरक्षण दिले आहे. सविस्तर माहिती अशी की, पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत पोटगीसाठी दावा दाखल केला होता. मात्र, पतीच पत्नीची देखभाल करत होता. त्यामुळे न्यायालयाने पोटगीची रक्कम दैनंदिन खर्चात विलीन केली होती. तर तिने दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात ती पुरावा दाखल करू शकली नव्हती. त्यामुळे पतीने अँड. विजयकुमार ठोंबरे, अँड. हितेश सोनार आणि अँड. नीलेश वाघमोडे यांच्यामार्फत तो दावा रद्द करण्याबाबत अर्ज केला होता. त्या अजार्चा राग आल्याने तिने पतीस मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरवात केली. पीडित पती एका खासगी कंपनीत काम करत असून पत्नी निवृत्त शिक्षिका आहे. त्यांना 16 वर्षांची मुलगी आहे. दीड वर्षांपूर्वी पत्नीने पोटगीकरिता दावा दाखल केला होता.  

* महिलांद्वारे पतीचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरुपयोगपती आणि पत्नी त्यांच्यात वाद झाल्याने पत्नीने गरम कुकर पतीच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान दाखवून पतीने बचावासाठी हात मध्ये घातला. कुकर गरम असल्याने त्याचा हातास गंभीर दुखापत झाली होती. अँड. ठोंबरे यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने पतीला मारहाण करणा-या पत्नीला तंबी दिली आहे. घरगुती हिंसाचाराचा हा प्रकार गंभीर आहे. महिलांद्वारे पतीचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरुपयोग देखील केला जातो. त्याकरता कायद्यामध्ये सुधारणा होणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद अँड. ठोंबरे यांनी केला. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस