शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

जो गुन्हा घडलाच नाही त्याची चिंता कशाला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 19:37 IST

उच्च न्यायालयात राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज घोटाळ्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली...

ठळक मुद्देतपासातून सगळे स्पष्ट होईल; अजित पवार यांचे वकील प्रशांत पाटील यांचा दावा

युगंधर ताजणे-  

पुणे : ‘‘राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्याविषयी नाबार्डने दिलेला अहवाल हा काही ऑडिट अहवाल नाही. त्याला न्यायालयात आव्हान देता येणार आहे. बँकेने देखील कुठल्याच पद्धतीचा गुन्हा घडला नसल्याचे आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले असून जो गुन्हा घडलाच नाही, त्याची काळजी कशाकरिता करायची? जे होईल त्याला तोंड देण्याकरिता तयार आहे,’’ अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील प्रशांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.  सक्त वसुली संचालनालयाने (इडी) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याविषयी अजित पवार यांचे वकील प्रशांत पाटील यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ईडीच्या कारवाईतील फोलपणा समोर आणला. पाटील म्हणाले, उच्च न्यायालयात राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज घोटाळ्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली. २०१५ या संदर्भात कुठल्याही प्रकारचा खटला कोर्टात चालला नाही. पुढे २०१६ मध्ये राज्य मध्यवर्ती सहकारी बँक कोर्टात हजर झाली. प्रत्यक्षात केस बोर्डावर आली. यात बँकेच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बँकेचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे म्हटले. मात्र हे कुणी लक्षात घ्यायला तयार नाही. महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अ‍ॅक्ट ८८ नुसार उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.  दुसरीकडे को-आॅपरेटिव्ह बँक अ‍ॅक्टनुसार बँकेच्या एखाद्या ऑडिटरला संचालकावर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार आहेत. को-आॅपरेटिव्ह क्षेत्रात या प्रकारचे गुन्हे दाखल होतात व त्याविरोधात न्याय मागण्याची तरतूद को-ऑपरेटिव्ह अ‍ॅक्टमध्ये आहे. त्यामध्ये ईडीचा काहीही संबंध नाही. अकाऊंट एनपीए होणे म्हणजे गुन्हा समजणे चुकीचे आहे. ही  गोष्ट या ठिकाणी समजून घ्यावी लागेल. तसेच लिलाव करून पैसे वसूल करणे यात चुकीचे काही नाही. तो फौजदारी गुन्हा ठरत नाही.  उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. तसेच दाद मागत असताना त्यांनी या प्रकरणाचा बारकाईने व नि:पक्षपातीपणे तपास करावा. आणि सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणाºया निकालावर उच्च  न्यायालयाच्या निर्णयाचा कुठलाही प्रभाव नसावा. या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे बँकेत आहेत. त्यामुळे २५ हजार कोटी कुठेही गेलेले नाहीत. तसेच १ हजार कोटी रुपयांचा नफा बँकेने मिळवला असल्याचे बँकेच्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. आता तेच कोर्टात सादर करणार आहोत. स्कॅम असेल तर तो पुढे येईलच. ईडीचे अधिकारीदेखील नि:पक्षपातीपणे तपास करत आहेत. ..............ईडीच्या कारवाईतून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे केवळ प्रसारमाध्यमांतून समजले आहे. त्याविषयी अधिकृत पत्र ईडीकडून मिळाल्यानंतर कायदेशीर पाऊल उचलले जाईल. त्याकरिता असणाऱ्या विशेष कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पूर्ण पुरावे आणि सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करुन कोर्टातील सुनावणीला सामोरे जाण्याची तयारी करणार असल्याचेही प्रशांत पाटील यांनी सांगितले. ......

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारfraudधोकेबाजीGovernmentसरकार