शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या शिक्षणासाठी आम्ही शाळांना पूर्ण शुल्क का द्यावे? पालकांकडून सवाल उपस्थित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 13:35 IST

शासनानेच शाळांना शुल्क कमी करण्यासाठी भाग पाडावे,अशी मागणी

ठळक मुद्देशाळा सुरू होण्याचा निर्णय लांबल्याने निराशा  

पुणे: ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वर्गात बसून मिळणारे शिक्षण ऑनलाईनमधून मिळत नाही. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रयोगशाळा, शैक्षणिक साहित्य व इतर मुलभूत सुविधांचा लाभ घेतला नाही. त्यामुळे अपुऱ्या शिक्षणासाठी आम्ही शाळांना पूर्ण शुल्क का द्यावे?,असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे शासनानेच शाळांना शुल्क कमी करण्यासाठी भाग पाडावे,अशी मागणीही पालकांकडून केली जात आहे.

राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील शाळा येत्या 3 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागणार आहे. प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण यात खूप मोठा फरक आहे. त्यातच कोरोना काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असताना शाळांकडून शुल्कात कोणतीही कपात केली जात नाही. तसेच शुल्क न भरल्याने काही शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासूनही वंचित ठेवत आहेत.

ऑनलाईन शिक्षण सुरू असतानाही अनेक शाळांकडून शंभर टक्के शुल्काची वसूली करत आहेत. परंतु,आमच्या पाल्यांना प्रत्यक्षात शिक्षण दिले तरच पूर्ण शुल्क भरू,असा परित्रा पालकांनी घेतला आहे. येत्या 13 डिसेंबरनंतर शहरातील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार होता.त्यानुसार आता 3 जानेवारीनंतरच शहरातील शाळांची घंटा वाजण्याची शक्यता आहे.परिणामी आणखी काही दिवस विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावरच अवलंबून राहावे लागणार आहे.---------------------शासनाने शाळांना पाणीपट्टी,वीज बील यांसह इतर करांमध्ये सवलत द्यावी. त्यामुळे शाळा कोरोना काळात पालकांकडून शुल्क वसूलीचा तगादा लावणार नाही. परिणामी शाळांबरोबर पालकांनाही दिलासा मिळेल. -  दिलीप विश्वकर्मा, महापॅरेंटस्--------------------- ग्रामीण भागाप्रमाणे शहरातील शाळाही सुरू झाल्या असत्या.परंतु,प्रशासनाने कोरोनाच्या रुग्णांची संख्या विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला नसावा. पालिकेला प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शहरातील शाळा 3 जानेवारीपर्यंत सुरू होणार नाहीत. परंतु, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहिल. - महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघटना-----------

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाonlineऑनलाइनEducationशिक्षणState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या