शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्डे का बुजवतो? असे म्हणत साईट इंजिनियरला लाथा बुक्क्यांनी मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 11:57 IST

हवेली तालुक्याच्या तरडे गाव येथील घटना, मारहाण करणारे सर्वच भावकीतल्या परिचयाचे

ठळक मुद्देघटनेत साईट इंजिनियरचे ४५ हजार रुपये व गळयातील ६ .५ तोळे वजनाची सोन्याची चैन लंपास

लोणी काळभोर: रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम चालू असताना ८ जणांनी खड्डे का बुजवतो? असे विचारून विनाकारण साईट इंजिनियरला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. गळ्याला तलवारी लावून हातातील लाठया व लाथांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले असल्याची घटना हवेली तालुक्यातील तरडे येथे घडली. 

याप्रकरणी सिव्हील इंजिनिअर अनिल पांडुरंग जगताप ( वय ३९, रा. तरडे गांव, ता हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून रविंद्र किसन जगताप ( वय ६५ ), वसंत सोपानराव जगताप ( वय ५५ ), शरद जयवंत जगताप ( वय ३६ ), किशोर वसंत जगताप ( वय २३ ), केतन वसंत जगताप ( वय २० ), किरण किसन जगताप ( वय ३६ ), किसन सोपानराव जगताप ( वय ६५ ), जयवंत सोपानराव जगताप ( ६२ वय सर्व रा. जगताप मळा, तरडे ) यांचेविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जगताप हे दामले - गंधे असोसिएटस कोथरूड, पुणे यांच्याकडे साईट इंजिनिअर या पदावर कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ते तरडे रोड, कुरकुंडे वस्ती या ठिकाणी रस्त्यावर पावसामुळे झालेल्या रस्त्यांचे खड्डे बुजवुन घेण्याचे काम करत होते.

दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जगताप मळा तरडे मध्ये राहणारे त्यांच्या परिचयाचे व भावकीचे वरील ८ जण कार मधून आले. त्यांच्या हातात काठया घेऊन खाली उतरले. त्यांच्या पैकी वसंत आणि रविंद्र जगताप यांनी त्यांच्या हातातील तलवारी गळयाला तलवारी अनिल जगताप यांचे गळ्याला लावून मुरुमाच्या गाडया अडवून रस्त्यावरील खडडे का बुजवितो हालायचे नाही असे म्हणाले. त्यानंतर इतर ६ जणांनी त्यांच्या जवळील लाठयांनी मारहाण केली तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांना मुक्कामार लागला व जखमा झाल्या. ते बेशुध्द झाले. यामुळे घटना पाहणारे अजय गाढवे, नितीन जगताप या दोघांनी त्यांना उपचारासाठी विश्वराज हॉस्पिटल लोणी स्टेशन येथे दाखल केले. ते शुध्दीवर आल्यानंतर खिशातील ४५ हजार रुपये रोख व गळयातील ६ .५ तोळे वजनाची सोन्याची चैन नसल्याचे त्यांचे लक्षात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी हे करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी