शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नुकसान समोर दिसत असताना पंचनामे काढायला वेळ लागतोच कशाला़? अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 1:01 AM

इतक्या लांब येत सारखे एकदा ताईंचे रेकॉर्ड नंतर त्याचे रेकॉर्ड असे करत वेळ घालणे कितपत योग्य आहे़?

ठळक मुद्देपवार यांनी जुन्नरच्या तहसीलदारांच्या कार्यशैलीची उडवली खिल्ली 

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जु्न्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांना जोरदार तडाखा दिला. या वादळी पावसाने शेतकºयांचे पीके, काहींच्या घरांचे असे अतोनात नुकसान केले. त्यात येणेरे येथील ठाकरवाडीमधील बाळू भालेकर यांच्या घर देखील वादळामध्ये उध्वस्त झाले.जुन्नर तालुक्यात वादळी फटका बसून झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गेले असता या कुटुंबाला त्यांनी ताई, तलाठी पंचनामे करायला आले होते का? हा प्रश्न विचारला. यावेळी तहसिलदार हनुमंत कोळेकर यांनी त्यांना प्राथमिक पाहणी केल्याचे सांगितले. यावर अजित पवार यांनी ‘कसली प्राथमिक पाहणी, मला तर काहीच कळेना.. हा शब्दच मी पहिल्यांदा समजला.. असे म्हणत कार्यशैलीचाच एकप्रकारे पंचनामा केला.तसेच पंचनामे करायला वेळ लागतोच कशाला असा सवाल उपस्थित करत तहसिलदाराला खडे बोल सुनावले. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या जुन्नर तालुक्याचा पाहणी दौरा करत नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट देखील घेतली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, तहसिलदार हनुमंत कोळेकर उपस्थित होते. पवार म्हणाले, इतक्या लांब येत सारखे एकदा ताईंचे रेकॉर्ड नंतर त्याचे रेकॉर्ड असे करत वेळ घालणे कितपत योग्य आहे़? घराचा पत्रा उडाला, शेतीचे नुकसान झाले हे असं सगळं चित्र समोर दिसत असताना पुन्हा पुन्हा पाहणीसाठी वेळ घालवणे ना तुम्हाला परवडण्यासारखे ना या नुकसानग्रस्त कुटुंबांना.. तसे दोन दिवसात सरकार दरबारी हे सगळी कामे मार्गी लागायला हवी होते, अशी टिप्पणी करत नाराजी व्यक्त केली. पवार यांनी यावेळी उज्जवला भालेकर यांचे सांत्वन करताना ताई ,मी राज्याचा उपमुख्यमंत्री, शिरुरचा खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके असे सर्व जण तुमच्याबरोबर आहोत. धीर सोडु नका ,असे प्रसंग येत असतात. यावेळी भालेकर यांनी मुलगी पोलीस प्रशिक्षण घेत असल्याची सांगितल्यावर तिला मदत करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.यावेळी लगेचच पवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन करून या कुटुंबाला मदत करण्याच्या सुचना दिल्या.  पवारांच्या कार्यशैलीचा अनुभव यानिमित्ताने उपस्थितीतांना मिळाला  

टॅग्स :Junnarजुन्नरAjit Pawarअजित पवारCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळFarmerशेतकरी