शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कलाकारांमध्ये भाषिक अस्मिता का दिसत नाही? श्रीपाद जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:09 IST

‘दाक्षिणात्य राज्यांमध्ये मातृभाषेची अस्मिता बाळगत सिने-नाट्यसृष्टीतील अनेकांनी राजकीय भवितव्य आजमावले.

पुणे : ‘दाक्षिणात्य राज्यांमध्ये मातृभाषेची अस्मिता बाळगत सिने-नाट्यसृष्टीतील अनेकांनी राजकीय भवितव्य आजमावले. परंतु १२ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात भाषिक अस्मिता बाळगत कला क्षेत्रातून नेतृत्व का पुढे येत नाही, असा खडा सवाल साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपस्थित केला.साहित्यिक-कलावंत संमेलनात ‘वाग्यज्ञे’ साहित्य व कलागौरव पुरस्काराचे वितरण जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे यांना, तर साहित्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या गेल आॅमव्हेट यांना प्रदान करण्यात आला. या वेळी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप बराटे, भारत पाटणकर, सचिव वि.दा. पिंगळे, खजिनदार संजय भामरे आणि उपाध्यक्ष राजेंद्र वाघ उपस्थित होते. कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. त्यामध्ये बंडा जोशी, प्रा. वा. ना. आंधळे, भरत दौंडकर, आसावरी काकडे, संगीत म्हसकर, प्रकाश घोडके, राजन लाखे, रमजान मुल्ला, ललिता सबनीस, दिनेश भोसले, अनिल दीक्षित, संदीप जगताप, दादाभाऊ गावडे आणि रमणी सोनवणे सहभागी झाले होते.महाकोशातील निधी १ कोटीवर जाऊ शकला नाही..साहित्य संमेलनासाठीचा महाकोशातील निधी १ कोटीच्या वर जाऊ शकला नाही, याची खंत वाटते. मराठी भाषेवरच उपजीविका असलेले प्राध्यापक, शिक्षक, लेखक मंडळी सढळ हाताने मदत करीत नाहीत. दाक्षिणात्य कलाकारांनी अभिनयातील प्रतिमांचे संवाहन केले. त्यामुळेच डीएमके, जयललिता, करुणानिधींसारखे नेतृत्व उभे राहिले. राजकारण म्हणजे केवळ टाकाऊ नाही, त्याद्वारे आपण अभिरुचीसंपन्न समाज घडवू शकतो. मराठी भाषिक कलाकारांमधून असे आदर्श निर्माण झाले पाहिजेत, असे जोशी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणे