शरद पवारांजवळ बसणे का टाळले? अजित पवार यांनी कारण सांगितलं, म्हणाले, "बाबासाहेब पाटील..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:47 IST2025-01-23T14:46:04+5:302025-01-23T14:47:01+5:30

Ajit Pawar : पुण्यात आज वसंतदादा शुगर इस्टिट्यूटची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार एकाच व्यासपीठावर आले.

Why did you avoid sitting near Sharad Pawar? Ajit Pawar explained the reason | शरद पवारांजवळ बसणे का टाळले? अजित पवार यांनी कारण सांगितलं, म्हणाले, "बाबासाहेब पाटील..."

शरद पवारांजवळ बसणे का टाळले? अजित पवार यांनी कारण सांगितलं, म्हणाले, "बाबासाहेब पाटील..."

Ajit Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार पुण्यात एकाच व्यासपीठावर आले. या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांच्या बाजूला बसायचे टाळले, यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. निमित्त होते वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा. हा कार्यक्रम आज पुणे येथे पार पडला. या समारंभाच्या निमित्ताने दुभंगलेल्या राष्ट्रवादीचे विविध नेते पहिल्यांदाच मोठ्या संख्येने एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. 

राष्ट्रवादी पुन्हा! पवार काका-पुतण्या एका मंचावर; जयंत पाटील-अजितदादांमध्ये गुफ्तगू

दरम्यान, व्यासपीठावर खासदार शरद पवार यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. पण, अचानक अजित  पवार यांनी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ती खुर्ची दिली.  अजित  पवार यांनी शारद पवार यांच्या बाजूला बसणे टाळले.यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, आता  खासदार पवार यांच्या बाजूला बसणे का टाळणे? यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. 

कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. अजित पवार म्हणाले, मी जागा बदलली कारण, बाबासाहेब पाटील यांचे शरद पवार यांच्याकडे काम होते. त्यामुळे मी बाजूला बसलो. माझा आवाज मोठा आहे, मी दोन खुर्ची सोडून बसलेल्या व्यक्तीसोबतही बोलू शकतो. या गोष्टीत बातमी होऊ शकत नाही. बाबासाहेब पाटील पहिल्यांदाच सहकार मंत्री झाले आहेत, म्हणून मी त्यांना पवार साहेबांजवळ जागा दिली, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. 

'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!

मागील दोन बैठकांना का आला नाहीत? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, मी तेव्हा कामात होतो.माझे जास्त आमदार कसे निवडून येतील, याचा मी विचार करत होतो, असंही अजित पवार म्हणाले. 

"लाडकी बहीण योजनेचा फायदा बांगलादेशींनी घेतल्याचे समोर आले आहे. आता कामदपत्रांची पडताळणी सुरू आहे. आधारकार्डचे लिंक केले जाईल. तसेच रिकव्हरीचा अजिबात विचार नाही, असंही पवार म्हणाले. 

Web Title: Why did you avoid sitting near Sharad Pawar? Ajit Pawar explained the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.