शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

"...तर अशोक सराफ मुख्यमंत्री झाले असते...", राज ठाकरे असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 19:28 IST

दक्षिणेत त्यांच्या प्रतिमेवर 40 - 40 फूट फलकावर दुग्धभिषेक झाला असता

पुणे : कलावंतांमुळे देशात अराजकता पसरलेली नाही. कारण कलावंतांमुळे आपण त्यात गुंतून राहतो आणि दुसरीकडे लक्ष जात नाही. आपल्याकडे अशोक सराफ हे गेली पन्नास वर्षे चित्रपटसृष्टीत राहून आपल्याला हसवत आहेत. खरंतर ते दक्षिणेकडे हवे होते. तिथे असते, तर ते आज मुख्यमंत्री झाले असते. परंतु, आपल्याकडे मात्र तसे महत्त्व दिले जात नाही. परदेशात कलावंतांची कदर केली जाते. अशोक सराफ हे युरोपात असते, तर तिथे खुद्द पंतप्रधान अशा कार्यक्रमाला आले असते, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

अभिव्यक्ती प्रस्तुत व रावेतकर आयोजित अशोक पर्व या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या सांगता समारंभाला ते आले होते. तेव्हा ते बोलत होते. अशोक सराफ यांच्या पंचाहत्तरी व चित्रपटसृष्टीतील पन्नास वर्षानिमित्त हा सोहळा आयोजिला होता. याप्रसंगी अशोक सराफ यांचा सन्मान राज ठाकरे यांच्या हस्ते झाला. अभिनेते प्रशांत दामले, निवेदिता सराफ, राजेश दामले, अमोल रावेतकर उपस्थित हाेते.

राज ठाकरे म्हणाले,           कलावंतांचे आपल्या देशावर खूप उपकार आहेत. देश चुकीच्या दिशेला गेला नाही, त्याला कारण अशोक सराफ यांच्यासारखे कलावंत आहेत. सर्व कलावंत, दिग्दर्शक, कवी, संगीतकार, नाट्यक्षेत्र, गायन नसते तर आपल्याकडे काय झाले असते. आपण बाहेरच्या देशात बघतोय काय होतेय ते. अशी माणसे आता होणे नाही.’’

सराफ हे मूळ बेळगावचे आणि जन्म मुंबईचा आहे. खरंतर त्यांनी बेळगाव सीमावाद प्रश्न सोडवायला हवा. यावर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि खुद्द अशोक सराफ यावर खळखळून हसले.

राज ठाकरेंनी चेहरा लपवला...

अशोक सराफ मनोगत व्यक्त करताना म्हणाले, राज ठाकरे हा माणूस माझा आवडता आहे. अभ्यास करून ते बोलतात. ते अतिशय ब्रिलियंट आहेत. त्यांच्याकडून माझा सन्मान होतोय, ते माझे खरोखर भाग्य आहे.’’ यावेळी व्यासपीठावर असणारे राज ठाकरे यांनी मात्र आपला चेहरा दोन्ही हाताने लपवला आणि त्यानंतर अशोक सराफांना नमस्कार केला.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेAshok Sarafअशोक सराफcultureसांस्कृतिक