शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
4
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
5
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
6
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
7
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
8
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
9
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
10
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
11
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
12
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
13
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
14
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
15
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
16
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
17
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
18
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
19
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
20
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स

हिंदी सक्तीच्या विरोधात भाजप लोकप्रतिनिधी गप्प का? आपचा प्रश्न; सक्तीच्या विरोधात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 20:40 IST

भाजपच्या लोकप्रतिनिधींबरोबरच शिक्षणसंस्था चालक पुढारीही या विषयावर हाताची घडी तोंडावर बोट धरून आहेत, अशी टीका करण्यात आली.

पुणे :हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी गप्प का, असा प्रश्न आम आदमी पार्टीने केला. पक्षाच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. भाजपच्या लोकप्रतिनिधींबरोबरच शिक्षणसंस्था चालक पुढारीही या विषयावर हाताची घडी तोंडावर बोट धरून आहेत, अशी टीका करण्यात आली.

आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, सुरेखा भोसले, शंतनू पांडे, शीतल कांडेलकर, अमोल मोरे, सुनील सवदी, संतोष काळे, सुभाष करांडे, उमेश बागडे, आरती करंजवणे, अंजना वांजळे, बाबासाहेब जाधव, अक्षय शिंदे, सतीश यादव, नीलेश वांजळे तसेच अन्य पक्ष पदाधिकारी यात सहभागी झाले होते. किर्दत म्हणाले, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात अशी सक्ती नाही, मात्र राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंदी भाषिकांची मते मिळावीत यासाठी ही सक्ती मराठी शाळांवर लादत आहे.

वास्तविक महाराष्ट्रातील अनेक बालमानसशास्त्र अभ्यासक अशा सक्तीच्या विरोधात आहेत. इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हा ताण देऊ नये असेच त्यांचे मत आहे. सरकारने सुरुवातीला भाषा सक्ती नाहीच अशी भूमिका घेतली. मात्र आता दुसरा विषय शिकायचा असेल तर किमान २० विद्यार्थी हवेत, शिक्षक नसेल तर ऑनलाइन शिकावे लागेल असे नियम लादून हिंदीची सक्तीच करत आहे, अशी टीका किर्दत यांनी केली. मतपेढीचा किंवा पक्षाचा विचार न करता भाजपच्या मराठी लोकप्रतिनिधींनी मराठीचे हित लक्षात घेऊन आपली मते व्यक्त करावीत, अशी मागणी आपच्या वतीने करण्यात आली.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाhindiहिंदीmarathiमराठीAAPआप