शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 10:33 IST

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील २१ पैकी १८ आमदार महायुतीचे, तर दोन आमदार महाविकास आघाडीचे आणि १ अपक्ष आमदार विजयी झाले.

पुणे : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मुंबईत गुरुवारी (दि. ५) सायंकाळी ५ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात काेणा-काेणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.

त्यात बारामतीमधून निवडून आलेले अजित पवार, आंबेगाव येथून निवडून आलेले दिलीप वळसे-पाटील, कोथरूडचे चंद्रकांत पाटील यांची नावे मंत्रिपदासाठी निश्चित मानली जात आहे तसेच राज्यमंत्रिपदासाठी पर्वती मतदारसंघाच्या माधुरी मिसाळ, पुणे कॅन्टोन्मेंटचे सुनील कांबळे, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, दौंडचे राहुल कुल, मावळचे सुनील शेळके आणि भोसरीचे महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा आहे. शिंदेसेनेचे पुरंदरमधून निवडून आलेले विजय शिवतारे यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील २१ पैकी १८ आमदार महायुतीचे, तर दोन आमदार महाविकास आघाडीचे आणि १ अपक्ष आमदार विजयी झाले आहे. महायुती सरकारमध्ये अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप वळसे-पाटील, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील शेळके यांचे नावही चर्चेत आहे.भाजपच्या कोट्यातून चंद्रकांत पाटील हे पुन्हा मंत्री होणार आहेत. त्याचबरोबर पर्वतीच्या माधुरी मिसाळ, दौंडचे राहुल कुल, भोसरीचे महेश लांडगे यांची राज्यमंत्रिपदावर वर्णी लागण्याची चर्चा आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असून तेथे दुसऱ्यांदा विजयी झालेल्या सुनील कांबळे यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024