शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

‘शिवभोजन’ थाळीमधून कोणाचे भरणार पोट ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 3:09 PM

कंत्राटदारांचीच ढेरी फुगण्याची शक्यता : कष्टकरी उपाशीच राहणार ?

ठळक मुद्देगरीब व मजुरांना दहा रुपयांमध्ये थाळी उपलब्ध करून देताना प्रचंड अटी दुपारी १२ ते २ याच वेळेतच जेवण उपलब्धप्रत्येक व्यक्तीला आपला फोटो व मोबाईल क्रमांकाची नोंद करणे बंधनकारक

सुषमा नेहरकर-शिंदे- पुणे : गरीब, मजूर व सर्वसामान्य जनतेला ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० गॅ्रम वरण आणि १५० ग्रॅम भात असलेली ‘शिवभोजन’ थाळी महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात येणार आहे. शिवभोजन थाळी मिळण्यासाठी तुम्हाला दुपारी १२ ते २ ही वेळ गाठण्याची कसरत करावी लागणार असून, एका ठिकाणी केवळ ७५ किंवा १५० व्यक्तींनाच जेवण मिळणार आहे. एवढेच नाही, तर तुम्हाला यासाठी संबंधित भोजनालयाच्या मालकाला मोबाईलवर फोटोदेखील द्यावा लागणार आहे. तुटपुंज्या ‘शिवभोजना’मुळे गरीब-कष्टकऱ्यांचे पोट भरणार तरी कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात गरीब जनतेला १० रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर १० रुपयांमध्ये भोजन उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेवरचा दबाव वाढला. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातल्या एका शहरात प्रायोगिक तत्त्वावर ‘शिवभोजन’ केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु, गरीब व मजुरांना दहा रुपयांमध्ये थाळी उपलब्ध करून देताना प्रचंड अटी घातल्या आहेत. यामध्ये शिवभोजन केंद्रावर केवळ दुपारी १२ ते २ याच वेळेतच जेवण उपलब्ध होईल. बाहेरचे खाद्यपदार्थ या केंद्रात घेऊन येण्यास व केंद्रातून जास्तीचे जेवण घेण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. एवढेच नाही तर जास्त भूक लागली असेल, तर जास्तीची चपाती, भाजी, वरण अथवा भातदेखील केंद्राच्या व्यक्तीला देण्यास बंदी घातली आहे. तसेच, प्रत्येक केंद्रावर प्रथम येणाºया ७५ अथवा १५० व्यक्तींनाच हे शिवभोजन देण्यात येणार आहे.या अटी कमी म्हणून योजनेचा कोणी गैरफायदा घेऊन नये, शिवभोजन घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपला फोटो व मोबाईल क्रमांकाची नोंद करणे बंधनकारक केले आहे. तर, सरकारी कर्मचारी आणि संबंधित केंद्रातील व्यक्तींना या भोजनाचा लाभ घेता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. जनतेला घातलेल्या अटींसोबतच केंद्रचालकांनादेखील अनेक जाचक अटी घातल्या आहेत. यामध्ये दुपारी १२ ते २ या वेळत केंद्रामध्ये शिवभोजन घेणाºया व्यक्तींना किमान एका वेळी २५ लोकांसाठी स्वतंत्र व राखीव जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांचा मोबाईलवर फोटो घेणे, त्याचा मोबाईल क्रमांक नोंदणी करणे बंधनकारक केले आहे............पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये २६ जानेवारीला ११ ठिकाणी ‘शिवभोजना’चा आरंभ

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये या ठिकाणी शिवभोजन 1पुणे शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या वतीने पुण्यात ७ आणि पिंपरी- चिंचवडमध्ये ३ ठिकाणी शिवभोजन सुरू करण्यात येणार आहे. एका दिवसात १,५०० लोकांना हे शिवभोजन देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ..........पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवभोजन केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार असून, रेल्वे स्टेशन, एसटी स्थानक, मार्केट यार्ड अशा ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.......पुणे शहरातल्या १ हजार लोकांना, तर पिंपरी- चिंचवडमधील ५०० लोकांना दररोज शिवभोजन मिळेल. ..........येथे मिळेल ‘शिवभोजन’४हडपसर गाडीतळ, कात्रज बस स्थानक, स्वारगेट बस स्थानक, मार्केट यार्ड, गुलटेकडी, महात्मा फुले मंडई, कौंटुबिक न्यायालय, शिवाजीनगर, महापालिका भवन, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, पिंपरी, वल्लभनगर बस स्थानक,  पिंपरी, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण.

टॅग्स :Puneपुणेshiv bhojnalayaशिवभोजनालयGovernmentसरकार