शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेतली ५ ते १० वर्ष प्रदीर्घ मुदतीच्या निविदा प्रक्रिया कोणाच्या फायद्यासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 16:04 IST

प्रदीर्घ मुदतीच्या निविदांना काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध

ठळक मुद्देकदम ५ वर्ष मुदतीची निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे चर्चा

राजू इनामदारपुणे: महापालिकेच्या अतिक्रमण व घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी त्यांच्याकडील कामाच्या प्रदीर्घ मुदतीच्या म्हणजे अनुक्रमे ५ व १० वर्षे मुदतीच्या निविदा काढल्या आहेत. इतक्या मोठ्या मुदतीच्या निविदा काढण्याला राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस यांनी पक्षीय स्तरावर विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी इतक्या मोठ्या मुदतीच्या निविदा प्रसिद्ध करण्याच्या प्रकाराबाबत संशय व्यक्त केला आहे.यातील एक निविदा अतिक्रमण विभागाला कंत्राटी पद्धतीने कामगार पुरवण्याची आहे. हे काम दरवर्षी अंदाजपत्रकातील तरतुद पाहून नव्याने निविदा प्रसिद्ध करून देण्यात येत असते. असे असताना एकदम ५ वर्ष मुदतीची निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे त्याची चर्चा आहे. ३० कोटी रूपयांची ही निविदा आहे. त्यासाठीची बयाणा रक्कमच ३० लाख रुपये होते. खात्याकडून निविदेचा प्रस्ताव मिळाल्यानंतर त्यावर अतिरिक्त आयुक्तांनी निविदा मुदत २ वर्षांची करावी असा शेरा मारला होता. तरीही खात्याच्या आग्रहामुळे ही निविदा ५ वर्षांचीच लावण्यात आली आहे.दुसरी निविदा कचºयाचे ओला व सुका असे वर्गीकरण करण्याची आहे. नऱ्हे -धायरी रस्त्यावरच्या कचरा वर्गीकरण केंद्रासाठी ही निविदा आहे. तीसुद्धा १० कोटी रूपयांची व १० वर्षांची आहे. त्याचीही बयाणा रक्कम १० लाख रुपए होते. हेही काम आतापर्यंत १ वर्षाच्या मुदतीनेच देण्यात येत होते. आताच कालावधी एकदम १० वर्षांचा का केला गेला, कचरा वर्गीकरणाचे साधे काम एकाच ठेकेदाराला सलग १० वर्षांसाठी देण्यात यावे का, तसे केले तर हे काम करणाऱ्या लहान उद्योजकांनी काय करावे असे प्रश्न यातून निर्माण होत आहेत.या दोन्ही निविदांना पालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी विरोध केला आहे. 

............................

एखादा प्रकल्प असेल तर त्याच्या निविदा दीर्घ मुदतीच्या काढणे समजू शकते. मात्र कामगार पुरवणे, कचरा वर्गीकरण करणे अशी कामेही ५ व १० वर्षे मुदतीने दिली जात असतील तर ही कामे सामान्य ठेकेदार घेऊच शकणार नाहीत. किंबहूना त्यांनी यात येऊ नये म्हणूनच ही व्यवस्था करण्यात आली आहे का असा संशय निर्माण होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व म्हणजे ४२ नगरसेवक याला तीव्र विरोध करतील.- चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष व आमदार

 .............................

भाजपाची सत्ता आली त्यावेळेपासूनच असे प्रकार सुरू झाले आहेत. काही विशिष्ट ठेकेदारांसाठी म्हणूनच हे केले जात आहे यात शंका नाही. अधिकाऱ्यांनी यात सहभागी व्हावे हे वाईट आहे. त्यांनीच सत्ताधाऱ्यांना या कामांच्या निविदा इतक्या मोठ्या मुदतीच्या काढता येणार नाही हे सांगायला हवे. काँग्रेसचा याला तीव्र विरोध आहे. - आबा बागूल , काँग्रेसचे गटनेते 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा