शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 22:30 IST

सध्या देशात आणीबाणीनंतर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले.

पुणे : सध्या देशात आणीबाणीनंतर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले. आज देखील देशाची हीच अवस्था असून, आगामी निवडणुकीत देशातील सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन देशाला चांगला पर्याय उपलब्ध करू देऊ, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २० वा वर्धापनदिन व पश्चिम  महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा पुण्यात सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल येथे आयोजित केली होता.  यावेळी पवार बोलत होते. सभेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, चित्रा वाघ,  हसन मुश्रिफ , दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, फौजिया खान, आण्णा डांगे, जयदेव गायकवाड, वंदना चव्हाण, जालिंदर कामठे उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘ देशात शेतकरी, व्यापारी, कामगार, सरकारी कर्मचारी कोणीच सुखी नाही. भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्याचा तर विक्रम झाला. नोटाबंदीचा निर्णय किती फसवा असल्याचे नेपाळमध्ये  आजही भारतीय जुन्या नोटा बदलून मिळातात यावरून स्पष्ट होते. त्यामुळे सत्तेवर येताना दिलेली सर्व आश्वासने फसवी असल्याचे आता जनतेच्या लक्षात आले आहे. छगन भुजबळ असो की देशाचे माजी अर्थंमंत्री पी. चिदंबरम यांना आत टाकण्याचे राजकारण भाजप करत आहे.  पुणे शहरातील एल्गार परिषदेच्या लोकांना नक्षलवादी ठरवणे असो की कोरेगाव-भीमामध्ये कोणी उद्योग केले हे सारे जगाला माहिती आहे. भाजप सरकारला लोकांचा पाठिंबा राहिलेला नाही.  त्यामुळेच देशातील सर्वच राज्यातील विरोधी पक्षाचे लोक भाजपच्या विरोधात एकत्र येण्याची मानसिकता तयार झाली असून, हीच मानसिकता भाजपचा पराभव करू शकते. ’’

देशातील जनतेचा ईव्हीएम मशिनवर विश्वास राहिला नाही. निवडणुकांमध्ये पराभव झाल्यावर मशिनबाबत तक्रार केली जाते असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. परंतु भंडारा-गोंदिया निवडणुकीत आमचा विजय होऊन देखील येथे मतदान यंत्रातील झालेल्या गोंधळाबाबत आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन यापुढे ईव्हीएम मशिन नकोच अशी भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. देशात, महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत परिर्वतन करण्याची गरज असून, यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसने पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा देखील पवार यांनी व्यक्त केली.

जयंत पाटील म्हणाले,  ‘‘आता पर्यंत गाव तेथे राष्ट्रवादी ही संकल्पना होती. पण आपल्या समोरील आवाहन मोठे आहे , त्यामुळे या पुढे ‘बुथ तेथे राष्ट्रवादी’ काम करण्याची गरज आहे. बुथ कमिटीच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहजण्याचे नियोजन केले.’ अजित पवार म्हणाले, ‘‘कोणीही सत्तेच्या गुर्मीत राहू नये, आज सत्तेत असलो तरी उद्या विरोधात बसू शकतात़  समाजातील एकही घटक समाधानी नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर झालाय. शेतकरी संपावर, शिक्षक संपावर, एसटी कामगार संपावर, सरकारी कर्मचारी संपावर, राज्यातील राज्यकर्ते करताय तरी का असा सवाल उपस्थित केला. यावेळी प्रफुल पटेल, सुनिल तटकरे,जयदेव गायकवाड, फौजीया खान आदी भाषण केले. आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत वंदना चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळSupriya Suleसुप्रिया सुळेDhananjay Mundeधनंजय मुंडेBhandara-Gondia Lok Sabha Bypoll 2018भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018