शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

चालकाच्या हाती स्टेअरिंग देण्यापूर्वी ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणी कोण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:16 IST

पीएमपीएमएल प्रशासन उदासीन, अध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) विविध आगारांमध्ये बसचालकांच्या हाती स्टेअरिंग देण्यापूर्वी चालकांची ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणी केली जात नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत उघड झाले. त्यामुळे दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात साधारण १७५० बसच्या माध्यमातून पीएमपीएमएलकडून सेवा दिली जाते. यात सरासरी ठेकेदारांच्या ९४१ आणि पीएमपीच्या ६५० बसगाड्यांचा समावेश आहे. पीएमपीएमएलच्या बसमधून दररोज साधारण ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई येथील बेस्ट अपघाताच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने बुधवारी पीएमपीच्या निगडी आणि पिंपरी आगारांची पाहणी केली असता, दोन्ही आगारांमध्ये पीएमपीच्या कायमस्वरूपी, रोजंदारीवरील आणि ठेकेदाराकडील अशा तिन्ही प्रकारच्या चालकांची कोणतीही तपासणी केली जात नसल्याचे आढळले.केवळ हजेरी कार्डवर नोंदणी करून चालकांना मार्गांवर पाठवले जाते. अपघातानंतर प्रत्येक वेळेस नावालाच काही दिवस तपासणी होते. नंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती होते. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी उदासीन आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.अध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपलीकात्रजवरून जाणाऱ्या बसला डिसेंबर २०२२ मध्ये बोपदेव घाटाजवळ अपघात झाला होता. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले होते. चालकाची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळले होते. त्यानंतर सर्व आगारांमध्ये चालकांकडे बस देण्याअगोदर त्याची ब्रेथ ॲनालायझरद्वारे चाचणी करूनच बसची चावी द्यावी, असे आदेश तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले होते.त्यानंतर २३ ऑक्टोबर २०२३ मध्ये बस चालकाने सेनापती बापट रस्त्यावर आठ ते दहा वाहनांना उडवल्याची घटना घडली होती. चालक दारू पिऊन बस चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता. या प्रकरणांची गंभीर दखल घेत प्रशासनाने गॅरेज सुपरवायझर, टाइम किपर यांनी सकाळ व दुपारपाळीत चालक वाहकांना ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी करून संबधित कर्मचाऱ्याची रजिस्टरवर नोंदणी करून सही घ्यावी, असे आदेश तत्कालीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले होते. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके दिवसच या निर्णयाची अंमलबजावणी झाली.पीएमपीएम एकूण बस - १९३९स्वमालकीच्या बस - १००४ठेकेदारांच्या बस - ९३५ई-बस - ४९०सीएनजी -डिझेल - २१४पीएमपीचे मनुष्यबळचालक - २९५०वाहक - ३५००

मुंबई येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पीएमपीएमएलच्या ठेकेदारांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वच चालकांची ‘ब्रेथ ॲनालायझर’ तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. - सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस