शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2024: आपला आमदार काेण हाेणार! मतदार फैसला करणार, प्रशासनही सज्ज

By नितीन चौधरी | Updated: November 19, 2024 19:24 IST

मतदान प्रक्रिया सुलभ होऊन मतदारांना मतदानाचा सुखद अनुभव यावा, मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी प्रशासन सज्ज

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी २१ मतदारसंघांमध्ये ८ हजार ४६२ मतदान केंद्र असून, या सर्व केंद्रांसाठी लागणारे मतदान साहित्य मंगळवारीच (दि. १९) वाटप करण्यात आले. ईव्हीएम, कंट्रोल युनिट तसेच व्हीव्हीपॅट ही यंत्रे २४ ठिकाणांहून वितरित केली. त्यासाठी १ हजार ९७० मार्गांवर १ हजार ५६९ बस, ७७ मिनीबस व १ हजार ७८७ जीप अशा एकूण ३ हजार ३०० वाहनांची व्यवस्था केली होती. यासाठी नेमलेल्या सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांनी हे साहित्य ताब्यात घेऊन आपापल्या मतदान केंद्रांना रात्री उशिरापर्यंत सज्ज केले होते. मतदान प्रक्रिया सुलभ होऊन मतदारांना मतदानाचा सुखद अनुभव यावा, मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी निवडणुका भयमुक्त, निपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे; याकरिता विविध राजकीय पक्षांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ८ हजार ४६२ मतदान केंद्र असून, त्यासाठी १३ हजार ६९४ मतदान यंत्रे अर्थात ईव्हीएम देण्यात आली आहेत. १० हजार १४४ कंट्रोल युनिट तसेच १० हजार ९९३ व्हीव्हीपॅट यंत्रे देखील दिले आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर ९ हजार ३०८ केंद्राध्यक्ष, ९ हजार ३०८ प्रथम मतदान अधिकारी व १२ हजार २३ अतिरिक्त मतदान अधिकारी असे एकूण ३९ हजार ९४८ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व मतदान केंद्रांसाठी मंगळवारी दुपारपर्यंत ईव्हीएम कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट या साहित्याची पूर्तता केली असून, रात्री उशिरापर्यंत सर्व मतदान केंद्र सज्ज करण्यात आले.

बुधवारी सकाळी सात ते सहा या कालावधीत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी पहाटे साडेपाच ते सकाळी सात या दीड तासात मॉक पोल घेतला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ईव्हीएम कंट्रोल युनिट व्हीव्हीपॅट बंद पडल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे राखीव यंत्रांचा साठा ठेवण्यात आला आहे. निवडणुकीसाठी पुरेसा पोलिस बंद ठेवण्यात आला आहे.

मतदानासाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना दोन तास पगारी सुटी द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. तर जास्तीत जास्त पात्र मतदारांनी मतदान करत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डाॅ. दिवसे यांनी केले आहे. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) मतदान आणि शनिवारी (दि. २३) मतमोजणी होणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केली आहे. मतदान केंद्राच्या २०० मीटर बाहेर प्रशासनाच्या वतीने निश्चित केलेल्या जागेवर १० बाय १० आकाराचे उमेदवारांचे तंबू लावावेत. त्याठिकाणी निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणारे कोणत्याही प्रकारचे पक्षाचे झेंडे, फलक, चिन्हे, चिठ्ठी आदी प्रचार साहित्य ठेवू नयेत. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील दहा हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध केले आहे, मतदारांनी या वाहनतळाचा वापर करावा.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मतदानाची गोपनीयता राखण्याकरिता मतदान केंद्र तसेच मतमोजणी केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात कोणताही मोबाइल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शस्त्र घेऊन येण्यास पूर्णतः बंदी आहे. त्यामुळे मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतराच्या बाहेरच ठेवावीत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

मतदानाच्या अनुषंगाने दिशाभूल करणारे संदेश पाठविल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक कामकाजाची छायाचित्रे काढणे किंवा चित्रीकरण करणे, त्यांचे तसेच निवडणूक विषयक अफवा पसरविणारे संदेशाचे व्हॉट्सॲप ग्रुप, समाजमाध्यमांवर प्रसारण करणे हा गंभीर गुन्हा आहे, असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी लोकशाही अधिक बळकटीकरण करण्यासाठी पुढे येऊन मतदान करावे, आपल्या परिसरातील पात्र मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे. - डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

गर्दी हाेणार नाही याची खबरदारी 

शहरात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जनजागृती सोबतच मतदान केंद्रांवर दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी महापालिकांनी देखील युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ९८ ठिकाणी सहा किंवा सात पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर एकूण मतदारांची संख्या मतदार यादीनुसार सुमारे दहा हजारांच्या घरात आहे. किमान ६० टक्के मतदान झाले, असे गृहीत धरले तरी दिवसभरात किमान ६ हजार मतदार याठिकाणी जमणार आहेत. हे मतदान केंद्र एकतर महापालिकांच्या शाळा किंवा सरकारी इमारतींमध्ये असून त्या ठिकाणी मतदारांना ये-जा करण्यासाठी जास्तीतजास्त गेट असावेत, जेणेकरून गर्दी होणार नाही, अशी व्यवस्था केली आहे.

गृहमतदान उपक्रमाला प्रतिसाद 

गृहमतदानासाठी जिल्ह्यात २ हजार ३२६ अर्ज आले होते. त्यातील २ हजार २४५ अर्ज स्वीकारले होते. त्यात ८५ पेक्षा जास्त वयोमान असलेल्या मतदारांची संख्या १ हजार ९२५ असून, दिव्यांगांची संख्या ३२० इतकी आहे. गृहमतदान उपक्रमांतर्गत ८५ पेक्षा जास्त वयोमान असलेल्या १ हजार ८४४ मतदारांनी आणि दिव्यांग ३१० मतदारांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSocialसामाजिकPoliceपोलिसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार