शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोण होणार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ? आघाडी बाजी मारणार की, अजित पवारांचा दरारा कायम राहणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 20:23 IST

सभापती, उपसभापती निवडीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या प्रमुखांचे लक्ष लागले आहे.

नीरा : पुरंदर आणि बारामती तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी पालकमंत्री अजित पवारांचे वर्चस्व होते. आता राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे नीरा बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या प्रमुखांचे लक्ष लागले आहे.

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया आता जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिसूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्यावतीने काढण्यात आली आहे. यानुसार येत्या मंगळवारी (दि. २५ फेब्रुवारी) सासवड येथील उपबाजारामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर व विधानसभा निवडणुकीत झालेल्या शहा काटशहाच्या राजकारणामुळे आता नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती कोण होणार ? याकडे पुरंदर आणि बारामतीतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे संचालक मंडळ आहे. संचालक मंडळाची निवड ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, शरद पवार एकत्र असताना झाली होती. यावेळी राष्ट्रवादीचे दहा उमेदवार निवडून आले होते, तर काँग्रेसचे आठ उमेदवार निवडून आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कार्यकाळ वाटून घेण्यात आला होता. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील संचालक शरद जगताप यांना पहिल्यांदा सभापती करण्यात आले होते. सध्या तरी काँग्रेसचा सभापती होईल असे म्हटले जात आहे. खरी स्पर्धा आहे ती उपसभापती पदासाठी. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या महाविकास आघाडीचे प्राबल्य आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्याकडे सहा बाजार समितीचे संचालक, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे चार संचालक असल्याचे बोलले जात आहे, तर संजय जगताप यांच्याकडे आठ संचालक आहेत. विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय समीकरणानुसार महाविकास आघाडीकडे एकूण बारा संचालक आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी ऐनवेळी संभाजी झेंडे यांना उमेदवारी देऊन संजय जगताप यांच्या विजयामध्ये अडथळा निर्माण केली.अजित पवार यांनी जगताप यांच्या विजयाचा मार्ग दिवे घाटाखालीच अडविला. त्यामुळे आता या सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून अजित पवार गटाला का महत्त्व द्याव? असा सवाल काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. काँग्रेसमधून अजित पवार यांच्या विरोधात नाराजी असल्याचे पाहायला मिळते आहे. जर काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर अजित पवार यांचा उपसभापतीही होऊ शकणार नाही. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. मात्र, असे असले तरी संजय जगताप अजित पवारांशी थेट पंगा घेणार नाहीत. असेदेखील काही संचालकांकडून बोलले जात आहे.

हे आहेत सभापतिपदाचे दावेदार ?यावेळचे सभापतिपद हे काँग्रेसकडे असणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामधून सभापती पदासाठी संदीप फडतरे, देविदास कामथे, अशोक निगडे यांची नावे पुढे येत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बाळासाहेब शिंदे, शरयू वाबळे यांची नावे आघाडीवर आहेत. शरद पवार गटाकडूनदेखील गणेश होले यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उपसभापती पदाच्या निवडीत चुरस निर्माण झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारAgriculture Sectorशेती क्षेत्रcongressकाँग्रेस