शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

Savitri Bai Phule: सावित्रीबाई फुले कोण होत्या? पुणे विद्यापीठातील नवी पिढीच अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:20 IST

सावित्रीबाई फुलेंच्या आभाळाएवढ्या कामाबद्दल आजही अज्ञान

मानसी जोशी/किमया बोराळकर

पुणे: आद्य स्त्रीशिक्षक असलेल्या सावित्रीबाई फुले यांची आज (दि.३) १९२ वी जयंती. पती ज्योतिराव फुले यांच्या पावलांवर पाऊल टाकत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी स्वत:ला समर्पित केले. ज्योतिरावांनंतरही त्या मूळ गावी जाऊन काम करत होत्या. त्यानंतर पुण्यात प्लेगची साथ आल्यावर पुन्हा पुण्यात येऊन त्यांनी प्लेगच्या रुग्णांच्या सेवेत स्वत:ला जुंपून घेतले व त्यातच त्यांचे निधन झाले.

अशा सावित्रीबाईंविषयी नव्या पिढीला काहीही विशेष माहिती नाही हे धक्कादायक वास्तव आहे. त्यांच्याच नावे असलेल्या सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठातील उच्च शिक्षण घेणाऱ्या युवतींशी संपर्क साधल्यानंतर हे विशेषत्वाने जाणवले. सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षक होत्या. यापुढे त्यांच्या माहितीची गाडी जात नाही. अनेकींना तर त्यांचे मूळ गाव कोणते, त्यांचा काळ, मुलींना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी काय कष्ट घेतले याची माहितीच नाही.

प्रश्न : सावित्रीबाई फुले कोण होत्या? आणि त्यांच्या कार्याची माहिती आहे का?-सावित्रीबाई या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मात्र, अन्य कार्याबद्दल काही कल्पना नाही.

- तरुणी (एलएलबी)

प्रश्न : सावित्रीबाई फुलेंची ही कितवी जयंती आहे?-माफ करा, मला निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु, माझ्या अंदाजानुसार शंभरावी किंवा एकशे पंचविसावी असावी.

- तरुण ( विज्ञान शाखा)

प्रश्न : सावित्रीबाई फुले या कवयित्रीही होत्या. त्यांची एखादी कविता माहिती आहे का?-त्या कवयित्री होत्या हे मला तुमच्याकडूनच माहिती होत आहे. खरे आहे का?

- तरुणी (परदेशी भाषा विभाग )

प्रश्न : सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाशिवाय विधवा पुनर्विवाह, बालविवाह, सती प्रथा या समाजविघातक चालीरीती बंद करण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे याविषयी काही कल्पना आहे का?-शाळेत असताना इतिहासाच्या अभ्यासक्रमात बालविवाहाबद्दल वाचल्याचे आठवते, पण सती प्रथा, विधवा पुनर्विवाह याबद्दल काहीच माहिती नाही.

- तरुण (कला शाखा )

प्रश्न : पुण्यात सन १८९६ मध्ये प्लेगची साथ आली होती. रुग्णांच्या सेवेदरम्यान सावित्रीबाईंचा मृत्यू झाला होता. त्यांच्या या मोठ्या योगदानाबद्दल माहिती आहे का?-पुण्यात प्लेगची साथ आली होती याची माहिती आहे, पण सावित्रीबाईंनी त्यात काय काम केले याविषयी वाचनात आले नाही.

- तरुणी (ललित कला केंद्र )

विद्यापीठच जबाबदार

या स्थितीला निश्चितपणे शालेय तसेच महाविद्यालयीन विभागच जबाबदार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाविषयी तर बोलायलाच नको. त्यांना अथर्वशीर्षावर अभ्यासक्रम तयार करता येतो, पण सावित्रीबाईंचे जीवनकार्य समोर आणावे असे काही वाटत नाही. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर यासाठी अभ्यासक्रमातच माहिती उपलब्ध करून द्यावी. - बाबा आढाव (ज्येष्ठ समाजसुधारक, अध्यक्ष महात्मा फुले समता प्रतिष्ठान.) 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेEducationशिक्षण