शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान चा एजंट कोण? कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात निदर्शने

By राजू इनामदार | Updated: May 9, 2023 16:41 IST

पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या कुरूलकरची कसून चौकशी व्हावी

पुणेराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डीआरडीओ मधील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकर याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. पुण्याचाच रहिवासी असलेल्या कुरुलकरच्या विरोधात आता जनमत प्रक्षुब्ध होऊ लागले आहे. राजकीय पक्षांनीही त्यात सहभागी धार्मिक होत आहे. देशप्रेमाचे धडे देणाऱ्या संघटनेत अशी देशद्रोही क्रुत्ये करणारे असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून संघावरही टीका केली जात असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.

डॉ कुरुलकर याला आय एस आय या पाकिस्तानी लष्करी संघटनेसाठी हेरगिरी करताना पोलिसांनी पुण्यात पकडला आहे. त्याने आजपर्यंत पाकिस्तानी संघटना (आय एस आय) ISI ला काय गोपनीय माहिती पुरवली आणि देशाचं किती नुकसान केलंय, याचीही चौकशी व्हावी या मागणीकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बालगंघर्व चौक येथे करण्यात आलेल्या निदर्शनात अनेक स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते. यावेळी निषेधाच्या घोषणा झाल्या.

 माझ्या चार पिढ्या संघाचे काम करीत आहेत व माझ्यावर संघाचे संस्कार आहे. मी आर एस एस चा शाखा प्रमुख असून त्याकरीता कार्य करत असल्याचे डॉ. कुरूलकर अभिमानाने सांगतानाचे व्हीडीओ क्लिप प्रसार माध्यमांमघ्ये पहायला मिळत आहेत , ज्या संघटनेच्या स्वयंसेवकाला देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक केली त्या संघटनेने आता मात्र त्याचा आमचा काही संबध नाही असे जाहीर केले. या सर्व प्रकाराची कसून चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हीच व्यक्ती इतर कोणत्याही समाजातील असती किंवा अन्य कोणत्याही सरकारने ही कारवाई केली असती तर याच मंडळीनी संपूर्ण भारतात आरडाओरडा केला असता अशी टीका करण्यात आली. भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान चा एजंट कोण? संघ स्वयंसेवक अशा घोषणा देण्यात आल्या. शहराघ्यक्ष प्रशांत जगताप,  प्रवक्ते प्रदीप देशमूख , विनोद पवार, बाबा पाटील, सुवर्णा माने , प्रदीप हुमे  , वंदना साळवी , सुनिल पडवळ , विशाल गद्रे , राहूल तांबे आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलनSocialसामाजिकPoliceपोलिस