शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
4
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
5
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
7
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
8
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
9
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
10
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
11
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
12
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
13
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
14
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
15
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
16
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
17
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
18
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
19
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
20
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...

..कोणी ‘रेमडीसिवीर’ देता का ‘रेमडीसिवीर’? बारामती शहरात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 08:15 IST

केवळ बारामतीच नव्हे तर आसपासच्या फलटणसह इतर तालुक्यातून हे इंजेक्शन मिळविण्यासाठी बारामतीमध्ये रुग्ण येत आहेत.

ठळक मुद्देयापार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेने यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी बारामती शहरातील कोरोना रुग्णसंख्या गेली २५८७ वर

बारामती : कोरोना संसर्ग झाल्याने गंभीर अवस्थेतील रुग्णांवर देवगुणी ठरलेल्या ‘रेमडीसिवीर’ या इंजेक्शनचा बारामती शहरात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळविण्यासाठी मेडिकल व्यावसायिकांच्या दारोदारी भटकण्याची वेळ आली आहे. हा तुटवडा संपविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे. कोरोनाचा आलेख वाढल्यानंतर बारामतीत रुग्णांवर शासकीय पातळीवर प्रभावी उपचार करण्यासाठी प्रशासन यशस्वी ठरत आहे. 

शहरात आजपर्यंत ६0 जणांचा कोरोना बळी गेलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर यंत्रणा बसविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. अधिक अधिक रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यासाठी प्रशासन नियोजन करत आहेत. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल, रुग्णाचे आधारकार्ड तसेच इंजेक्शन आणणाऱ्या व्यक्तीचे आधारकार्ड घेतले जात आहे. त्यानंतरच हे इंजेक्शन देण्यात येते. प्रतिरुग्ण १ ते २ इंजेक्शन सध्या उपलब्ध होत आहे. शुक्रवारी (दि.१८) दुपारपासूनच या इंजेक्शनचा शहरात तुटवडा निर्माण झाला. केवळ बारामतीच नव्हे तर आसपासच्या फलटणसह इतर तालुक्यातून हे इंजेक्शन मिळविण्यासाठी बारामतीमध्ये रुग्ण येत आहेत.

शनिवारी (दि.१९) दुपारी १२ च्या दरम्यान बारामती शहरात हे इंजेक्शन उपलब्ध झाले. ते मिळविण्यासाठी कोविड उपचार केंद्राच्या ठिकाणी झुंबड उडाली होती. अत्यवस्थ रुग्णासाठी उपचार केंद्राकडून नातेवाईकांना तातडीने हे इंजेक्शन आणण्यास सांगितले जाते. मात्र यावेळी कोणत्या ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध आहे याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती मिळत नाही. एकीकडे कोरोना संसर्गमुळे अत्यवस्थ झालेला रुग्ण आणि दुसरीकडे या इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे नातेवाईक हतबल होतात. इंजेक्शनच्या काळजीने या नातेवाईकांचा ‘बीपी’ वाढतो. इंजेक्शन न मिळाल्यास आपल्या रुग्णाचे काय होणार या चिंतेपोटी नातेवाईक संबंधितांचे उंबरठे झिजवतात. यापार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेने यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

बारामती शहरातील कोरोना रुग्णसंख्या २५८७ वर गेली आहे. गेल्या २४ तासात शहरात ९५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. १ सप्टेंबरपासून शहरात सरासरी प्रतिदिन १०० रुग्ण आढळले आहेत. २ आठवड्यांचा जनता कर्फ्यु प्रशासनाने जाहीर केला. यामध्ये एमआयडीसीतील उद्योग व्यवसायांना सुट देण्यात आली. मात्र उदासीन नागरिकांमुळे जनता कर्फ्यु अयशस्वी ठरला. 

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूMedicalवैद्यकीय