शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नराधम दत्ता गाडेने गुन्ह्यानंतर कोणाला केला कॉल?; पोलिसांकडून शेतात मोबाईलचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:26 IST

आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या विविध दाव्यांमुळे या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे.

किरण शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे |

Swargate Rape Case: पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे दत्तात्रय गाडे या नराधमाने २६ वर्षीय पीडितेवर बलात्कार केला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे पोलिसांवरही फरार असलेल्या गाडेच्या अटकेसाठी मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर तीन दिवसांनी पोलिसांनी दत्ता गाडे याला ताब्यात घेतलं. मात्र आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या विविध दाव्यांमुळे या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आरोपीच्या मोबाईलमधून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलिसांकडून त्याच्या मोबाईलचा शोध घेतला जात आहे.

दत्ता गाडे याने त्याचा मोबाईल शिरूरमध्ये एका शेतात लपवल्याची माहिती आहे. घटना घडल्यावर आरोपीने मोबाईलवरून कोणा-कोणाला फोन केले याचा तपास केला जाणार आहे. तसंच मोबाईलमध्ये असलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशनवरून कधी कोणाला पैसे दिले आहेत का, याचाही पोलिसांना शोध घ्यायचा आहे.

दरम्यान, पोलिसांकडून आरोपीचा मोबाईल शोधण्याचे काम सध्या सुरू असून त्याच्या मोबाईलमधून नक्की काय गौप्यस्फोट होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा आरोपीचा प्रयत्न आरोपीबाबत अनेक वावड्या उठल्या आहेत. तो समलैंगिक असून, त्याद्वारे तो पैसे मिळवायचा. यापूर्वी आरोपी दत्तात्रय याने पोलिसांना तृतीयपंथी असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांपासून  बचाव कसा करायचा, याबाबत आरोपीला चांगलीच माहिती असून तो शातीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 

टॅग्स :Puneपुणेswargate bus depotस्वारगेट बसस्थानकSwargateस्वारगेटCrime Newsगुन्हेगारी