शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाळू उपशाला बंदी असताना वाळू येते कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 13:19 IST

जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ ते  फेब्रुवारी २०१९ या कालावधीत एकूण ७८० वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून १ हजार ८६१ ब्रास वाळू जप्त केली.

ठळक मुद्देराष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशामुळे नियमानुसार केला जाणारा वाळू उपसा बंद वाळू मिळत नसल्याने बांधकाम व्यावसायिकांनी केला इतर पर्यायांचा स्वीकार

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात वाळू उपशाला परवानगी देण्यात आली नसली तरी पुणे शहर व परिसरात सुरू असलेल्या बांधकामांना आवश्यक असलेली वाळू कमी पडत नाही. त्यामुळे या बांधकामांसाठी वाळू येते कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच खनिकर्म विभागाने गेल्या ११ महिन्यात जिल्ह्यात अवैध वाहतूक करणाऱ्या तब्बल ७८० वाहनांवर कारवाई केली असून त्यांना ८ कोटी १७ लाख रुपयांचा दंड केला आहे. त्यातील ५ कोटी २३ लाख रुपये दंड वसूल केला आहे. वाळूमाफियांनी राज्यातील नदीपात्रातून मोठ्याप्रमाणावर वाळू उपसा केला.सर्वसाधारणपणे नदीपात्रामधील तीन फुटापर्यंतच्या वाळूचा उपसा करता येतो. परंतु, वाळूचा तुटवडा आणि बांधकाम व्यावसायाकडून केली जाणारी वाळूची मागणी यामुळे अवैध वाळू होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून बहुतांश सर्व तालुक्यातील बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाºयांवर कारवाई केली. तरीही शहरात मोठ्याप्रमाणावर वाळूची वाहतूक करणारे ट्रक फिरताना दिसतात. प्रामुख्याने रात्री उशिरा वाळूची वाहतूक केली जाते. नियमानुसार ट्रकच्या वजना एवढ्याच वाळूची वाहतूक करता येते. मात्र, ट्रकच्या दुप्पट-तिप्पट वजनाच्या वाळूची वाहतूक होत असल्याचे खनिजकर्म विभागाच्या निदर्शनास आले आहे. अहमदनगर, सोलापूर आदी जिल्ह्यातून वाळू पुण्यात दाखल होते. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे परवाना नसल्यास संबंधित वाहनावर कारवाई केली जाते. जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ ते  फेब्रुवारी २०१९ या कालावधीत एकूण ७८० वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून १ हजार ८६१ ब्रास वाळू जप्त केली. त्यातही हवेली तालुक्यात सर्वाधिक वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून वाळू उपसा परवाना देण्याची प्रक्रिया बंद आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशामुळे नियमानुसार केला जाणारा वाळू उपसा बंद झाला. वाळू मिळत नसल्याने बांधकाम व्यावसायिकांनी इतर पर्यायांचा स्वीकार केला आहे. परंतु, प्लास्टर करण्यासाठी वाळूची आवश्यकता भासते. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. मात्र, या वाळू उपशाला लगाम घालण्यास शासन अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेsandवाळूPoliceपोलिसcollectorजिल्हाधिकारी