शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

ऑनलाईन पीयुसी कुठे आहे भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 07:00 IST

ऑनलाईन पीयुसी केंद्रांची संख्या खुप कमी तसेच नव्याने सुरू झालेल्या केंद्रांची माहिती वाहनचालकांना उपलब्ध होत नसल्याने शोधाशोध करावी लागत आहे...

ठळक मुद्देऑनलाईन पीयुसी केंद्रांची माहिती परिवहनच्या संकेतस्थळावरवाहनांशी संबंधित बहुतेक कामांना आरटीओमध्ये पीयुसी प्रमाणपत्र आवश्यक

पुणे : परिवहन विभागाने राज्यभरात ऑनलाईन पीयुसी (पोल्युशन अंडर कंट्रोल) प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. मात्र, ऑनलाईन पीयुसी केंद्रांची संख्या खुप कमी तसेच नव्याने सुरू झालेल्या केंद्रांची माहिती वाहनचालकांना उपलब्ध होत नसल्याने शोधाशोध करावी लागत आहे. याबाबत काही वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रांची संख्या वाढविण्याबरोबरच त्याची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील कारचे पुण्यात दोन पीयुसी केंद्रावरून पीयुसी देण्यात आले होते. याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाल्यानंतर परिवहन विभागाने बोगस पीयुसीला आळा घालण्यासाठी सर्व पीयुसी केंद्र ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दि. २४ सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यानुसार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत असलेली जुन्या पध्दतीची सुमारे पावणे तिनशे पीयुसी केंद्र एका दिवसात बंद करण्यात आली. त्यादिवशी पुणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात केवळ २५ नवीन ऑनलाईन केंद्रांची नोंदणी झाली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यातील काही केंद्र सुरूही झाली नव्हती.या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होऊन दहा दिवस उलटल्यानंतरही त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, पुणे जिल्ह्यामध्ये शुक्रवार (दि. ४) पर्यंत केवळ ५७ आॅनलाईन पीयुसी केंद्र सुरू झाली आहेत. त्यामध्ये पुणे आरटीओ क्षेत्रात ३९, पिंपरी चिंचवडमध्ये १७ आणि बारामती कार्यक्षेत्रात केवळ १ केंद्र आहे. पुणे शहरातच वाहनांची संख्या ३८ लाखांहून अधिक आहे. या वाहनांसाठी सध्या केवळ ३९ पीयुसी केंद्र असल्याने वाहनचालकांना पीयुसी प्रमाणपत्र घेण्यासाठी केंद्रांची शोधाशोध करावी लागत आहे.सहकारनगरमधील एका वाहनचालकाने ' लोकमत' शी बोलताना याबाबत नाराजी व्यक्त केली. सातारा रस्ता परिसरात पीयुसी केंद्राबाबत ७ ते ८ ठिकाणी चौकशी केली मात्र कुणालाही काही माहिती नाही. गाडी जुनी झाल्याने नव्याने पासिंग करायचे आहे. त्यासाठी पीयुसी गरजेचे आहे. पण नवीन केंद्र कुठे आहेत, याची माहिती मिळत नाही, असे त्यांनी सांगितले. ...............वाहनांशी संबंधित बहुतेक कामांना आरटीओमध्ये पीयुसी प्रमाणपत्र आवश्यक असते. या प्रमाणपत्राशिवाय कामे होत नाहीत. तसेच वाहतुक पोलिस, आरटीओकडूनही पीयुसी तपासणी केली जाते. प्रमाणपत्र नसल्यास वाहनचालकांना दंड आकारण्यात येतो. पण सध्या पीयुसी केंद्र पुरेशी नसल्याने वाहनचालकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संकेतस्थळावर यादी उपलब्धऑनलाईन पीयुसी केंद्रांची माहिती परिवहनच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या संकेतस्थळावरील ऑनलाईन सेवा विभागात पीयुसी लिंकवर केंद्रांची यादी उपलब्ध आहे. त्यामध्ये आरटीओनिहाय पीयुसी केंद्रांच्या नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहिती नमुद करण्यात आली आहे. वाहनचालकांना केंद्र शोधण्यासाठी सध्यातरी हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. ऑनलाईन पीयुसी केंद्रांची माहिती परिवहन संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाहनचालकांना त्यावरून माहिती सहज उपलब्ध होईल. तसेच पीयुसी केंद्रांची नोंदणी सुरू असून ही केंद्र वाढत जातील. - विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :PuneपुणेbikeबाईकonlineऑनलाइनRto officeआरटीओ ऑफीस