शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
3
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
4
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
5
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
6
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
7
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
8
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
9
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
10
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
11
"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला
12
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
13
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
14
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
15
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
16
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
19
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता

११ लाख कुठं गेले? जेसीबी प्रकरणात कोणी कोणी साथ दिली? याचा तपास करायचा आहे - सरकारी वकील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:24 IST

पैसे मागायला गेल्यावर अपमानास्पद वागणूक देऊन पिस्तुलाचा धाक ही दाखवत कुटुंबाला सोडणार नाही, अशी धमकी हगवणे यांनी दिली होती

राजगुरुनगर: म्हाळुंगे (ता खेड )पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जेसीबी वाहन खरेदीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात शशांक राजेंद्र हगवणे वय २७ आणि लता राजेंद्र हगवणे वय ५० दोघेही रा भुकूम ता मुळशी या मायलेकांना दि. ६ जून पर्यंत खेड प्रथमवर्ग न्यायदंडनाधिकारी यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी तिचा पती शशांक व सासू लता हगवणे हे मुख्य आरोपी आहेत.             प्रशांत अविनाश येळवंडे यांनी शशांक राजेंद्र हगवणे यांच्याकडून २४ लाख रुपयांना जेसीबी खरेदी केला होता. जेसीबीवर इंडसइन बँकेचे १९ लाख रुपये कर्ज बाकी होते. कर्ज फेडण्यासाठी ५० हजार रुपये दरमहा व ५ लाख रुपये चेकद्वारे हगवणे यांना देण्याचे ठरले होते. येळवंडे यांच्याकडून ५ लाख रुपये चेक स्वरूपात हगवणे यांनी घेतले. व कर्ज हप्ते रुपयेत ६ लाख ७० हजार रुपये असे मिळून ११ लाख ७० हजार रुपये स्वीकारले होते. ते बँकेत न भरता परस्पर वापरले. दरम्यान बँकेने हप्ते भरले नाहीत म्हणून येळवंडे यांच्याकडे असणारा जेसीबी बँकेने जप्त केला. येळवंडे यांनी जेसीबी द्या किंवा पैसे द्या अशी मागणी शशांक हगवणे यांच्याकडे केली. त्यावेळी जवळचे पिस्तूलाचा धाक दाखवत तू मशीन वापरले आहे. आता पैसे मागू नको. नाहीतर घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी दिली. याबाबत प्रशांत येळवंडे यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात मे २०२४ ला फिर्याद दिली होती. त्यानुसार शशांक आणि लता हगवणे यांच्या विरोधात २९ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता.                  वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात येरवडा जेलमध्ये असलेले मुख्य आरोपी शशांक हगवणे आणि त्याची आई लता हगवणे यांना महाळुंगे पोलीस जेलमधून काढून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आज (दि.३) रोजी चार वाजण्याच्या सुमारास त्यांना खेडच्या न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे व्ही मस्के यांच्या पुढे हजर केले. फिर्यादी पक्षाच्या बाजूने सहाय्यक सरकारी वकील श्रीमती के डी सोनवणे यांनी बाजू मांडली. आरोपीच्या बाजूने स्वानंद गोविंदवार यांनी बाजू मांडली. त्यांच्या सोबत अॅड. अतिक सय्यद यांनी कामकाज केले  

 सहाय्यक सरकारी वकील श्रीमती के डी सोनवणे  

- जेसीबी 24 लाखांचे घ्यायचे ठरले. 5 लाखांचे चेक दिले, नंतर कर्ज फेडण्यासाठी दर महा ५० हजार रुपये दिलेत. असे एकूण ११ लाख ७० हजार दिलेत.- काही महिन्यांनी बँकेच्या एजंट ने जेसीबी जप्त केला अन आरोपीने जेसीबी स्वतःच्या ताब्यात ही घेतला.- नंतर पैसे मागायला गेले असता अपमानास्पद वागणूक दिली. पिस्तुलाचा धाक ही दाखवत कुटुंबाला सोडणार नाही, अशी धमकी ही दिली.- मे 2024 मध्ये पोलिसांकडे तक्रात केली, तेंव्हा पैसे देतो असं आरोपी म्हणाला. प्रत्यक्षात पैसे दिलेच नाही.- जे लोक जेसीबी जप्त करायला आले होते, ते कोण होते? कुठून आले होते? याचा तपास करायचा आहे. - दिलेली रक्कम कुठं आहे आणि ती वसूल करायचे आहे.  - या प्रकरणात कोणी-कोणी साथ दिली, याचा शोध घ्यायचा आहे- पिस्तुल परवानाधारक आहे का? याचा तपास करायचा आहे. - जेसीबी खरेदीची ओरिजिनल कागदपत्रे आरोपींकडे आहेत, ते नंतर देऊ असं ते वारंवार म्हणत आलेत. त्यामुळं आम्ही ते आत्ताच सादर करु शकत नाही. त्याचाच शोध घ्यायचा आहे. 

आरोपीचे वकील अॅड. स्वानंद गोविंदवार

- जेसीबी अथवा इतर मशनरी भाडे तत्वावर दिलं जातं. त्या प्रमाणे हे जेसीबी भाडे तत्वावर दिले होते. उलट त्यांनी अपुरे भाडे दिले.- जर त्यांनी जेसीबी खरेदी केला असेल तर करारनामा कुठं आहे? किमान फोटो तरी हवा होता? आता कोणती तरी कागदपत्रे सादर करुन हगवणे यांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे.- हगवणे कुटुंबावर जे संकट आलेलं आहे. त्याचा गैरफायदा घेऊन, यांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय.- बंदूक परवानाधारक आहे, हे माध्यमांमध्ये आलेलं आहे.- उलट ५ ते १० लाख रुपये प्रशांत येळवंडे यांच्याकडून येणे बाकी आहे.- हे फक्त षडयंत्र आहे, हगवणे कुटुंबाला जास्तीतजास्त तुरुंगात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.- बँकेचा जो एजंट आहे, त्याच्याकडे स्वतंत्र चौकशी करता येऊ शकते. यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. हगवणे माय - लेकाला न्यायालय कोठडी द्यावी. - संतोष जायभाय तपास अधिकारी म्हाळुंगे पोलीस स्टेशन  मे २०२४ च्या तक्रारीनंतर आरोपी हगवणे याने जबाब दिला होता. यामध्ये हा जेसीबी विक्री केल्याचं त्याने स्वतःच कबुल केलं आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेCourtन्यायालयPoliceपोलिसadvocateवकिल