शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

पुणे शहरातील ‘त्या’पेठांमधल्या नागरिकांचा कोंडमारा केव्हा सुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 1:56 AM

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केले होते ‘लॉक’

ठळक मुद्देगल्लीबोळ बंदच: सोमवारी निर्णय होण्याची शक्यता

पुणे: शहराच्या बहुतेक भागांची कोरोना टाळेबंदीतून बर्याच प्रमाणात सुटका झाली. मध्यभागातील पेठां व काही परिसर मात्र अजूनही कोंडलेलाच आहे. बांबूवर पत्रे लावून बंद केलेला गल्लीबोळ तसेच रस्तेही बंदच आहेत. नागरिकांना ते कधी खुले होणार याची प्रतीक्षा आहे.कंटेन्मेट म्हणजे डेंजर झोन (सर्वाधिक कोरोना रूग्ण सापडत असलेला परिसर) जाहीर केल्याने पेठांची अडचण झाली आहे. दत्तवाडीतून पुढे शुक्रवार पेठेकडे जाणारा रस्ता, पर्वतीकडून शिवदर्शन, सहकार नगरकडे जाणारा रस्ता फडगेटपासून गुरूवारपेठेकडे जाणारा रस्ता, गंजपेठेतून पुढे भवानीपेठेत जाणारा रस्ता, त्यापुढे सोन्या मारूती चौकातून रास्तापेठ, गणेश पेठेतून गुळ आळी, कँम्पचा बराच मोठा भाग, वानवडी, लोहियानगर असा फार मोठा परिसर प्रशासनाने पोलिसांच्या साह्याने पत्रे लावून बंद केला आहे. या भागातून जास्त रूग्ण मिळत असल्याने संसर्ग वाढू नये म्हणून महिनाभरापूर्वी ही व्यवस्था करण्यात आली. कोरोना लॉकडाऊन मधून पुण्याच्या अन्य बर्याच मोठ्या परिसराला यातून मोकळीक मिळाली आहे. 'पुनश्च: हरिओम' मध्ये तर  तिथे आता दुकानेही सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुली असतात. कंटेन्मेट झोनमध्ये मात्र फक्त सकाळी गर्दी असते. बहुसंख्य दूकानदार दूपारी १ वाजता विक्री बंद करून निघून जातात. त्यांच्यापर्यंत यायचे म्हटले तरी नागरिकांना बांबूखालून, पत्रे तिरके करून कसरत करत यायला लागते. भाजीपाला, किराणा सामान घेतानाही हीच स्थिती आहे. या परिसरात महापालिकेचे बरेच कर्मचारी आहेत. खासगी संस्थामधील नोकरदार व पालिका कर्मचार्यांना रोज कामावर जावेच लागते. त्यांनाही जाताना येताना अशीच कसरत करावी लागते. त्यांना राहत्या गल्लीतून बाहेर मुख्य रस्त्याला जाणेच अवघड झाले आहे. त्यांच्यातील अनेकजण आपली वाहने रस्ता बंद केला तिथेच ठेवून पुढे पायी येतात जातात.आता भवानी पेठ व अन्य काही भागातून कोरोना रूग्ण मिळून येणे कमी झाले आहे. तरीही रस्ते खुले व्हायला तयार नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकसंख्येचे प्रमाण बरेच आहे. बहुतांश कुटुंबे गरीब हातावर पोट असणारी आहेत. त्याच भागात कोणाकोणाचे बेकरी, सलून, पंक्चर, भाजीपाला, वडापाव, चहानाष्टा अशी दुकाने आहेत. तीही मागील अडीच महिने बंदच आहेत. व्यवसाय बंद असल्याने या वगार्चेही हाल होत आहेत. किमान अन्य ठिकाणांप्रमाणे रस्ते खुले करून व्यवसायाला परवानगी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. गवरी आळी, नेहरू चौक, गणेश मार्केट अशा लहान भाजी मंडयाही प्रशासनाने अजून बंदच ठेवल्या आहेत. तिथे व्यवसाय करणार्यांनाही आता या लहान मंडया सुरू करून हव्या आहेत. -----/सुरूवातीला या भागात मोठ्या संख्येने रूग्ण सापडत होते, त्यामुळे आम्ही कोणत्याही कारवाईला कधी विरोध केला नाही. पण आता तीन महिने होत आलेत. रूग्ण साडणेही कमी झाले आहे. नागरिकांमध्येही जागरूकता आली आहे. त्यामुळे या भागातही आता मोकळीक देणे गरजेचे आहे. किमान मंडई, पंक्चर, फिटर सारखे काही व्यवसाय सुरू करायला परवानगी द्यावी व मुख्य म्हणजे रस्ते, गल्लीबोळ बंद करावेत. महापौर, प्रशासन यांच्याकडे तशी मागणी केली आहे.अजित दरेकर, स्थानिक नगरसेवक.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस