शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

माळशेज घाट रेल्वेमार्गाला मुहूर्त कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 14:23 IST

मार्गावर २६ रेल्वे स्थानक प्रस्तावित

ठळक मुद्देसर्वेक्षणाचे काम झाले पूर्ण; कामे मात्र रखडलेलीमार्गाचे तांत्रिक सर्वेक्षणाचे काम सुरू हा मार्ग कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, माळशेज घाट,  ओतूर ते नगर असा जाणार

राजुरी : नगर, ठाणे, पुण्याच्या ग्रामीण भागासाठी वरदान ठरणाऱ्या आणि तब्बल २२ वर्षांपेक्षाही अधिक काळ रखडलेल्या माळशेज रेल्वे मार्गाचे प्राथमिक आणि तांत्रिक सर्वेक्षणाचे काम कल्याण ते नगरपर्यंत पूर्ण झाले आहे. या मार्गावर २६ रेल्वे स्थानके  प्रस्तावित असून या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला कधी महूर्त मिळणार, या प्रतीक्षेत तिन्ही जिल्ह्यांतील नागरिक आहेत.  घाटाचा विकास व्हावा तसेच जलद वाहतूकीसाठी हा रेल्वे मार्ग प्रस्तावित होता. या मार्गाचे तांत्रिक सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. कल्याण ते नगर पर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्णही झाले. ठाणे जिल्हा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात ही माहिती  वर्षांपूर्वी उघडकीस आणली होती. या मार्गाचे तांत्रिक सर्वेक्षण एक वर्षाआधीच पूर्ण करण्यात आले आहे. हा मार्ग कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, माळशेज घाट,  ओतूर ते नगर असा जाणार आहे. या मार्गावर कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ कांभा रोड, आपटी, पाटगाव, मुरबाड, राव, डाहेरी मिल्हे, नागतार केबिन, वारीवघर केबिन, देवरूखवाडी, केबिन, मढ, जुन्नर रोड, ओतूर, पदरवाडी, मालवाडी, कोटडावाडी, शिंदेवाडी, वासुंदे, धोत्रे, भाळवणी, हमीदपूर आणि अहमदनगर अशी रेल्वे स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहे.    हा रेल्वे मार्ग पूर्णत: फायद्यात असल्याचे सांगण्यात येत असून या तांत्रिक सर्वेक्षणाचाचा प्राथमिक अहवाल आला असला तरी अंतिम अहवाल तयार करण्यात आल्यानंतरच तो रेल्वे बोर्डापुढे  मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. त्याला मान्यता मिळण्याची आता फक्त औपचारिकता बाकी असल्यामुळे हा मार्ग मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे माळशेज पट्टा व ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार हे नक्की.......मार्ग विशाखापट्टणमपर्यंत जोडता येणारनगर -औरंगाबादमार्गे पुढे विशाखापट्टणम हा मार्गदेखील जवळ होऊन जोडला जाऊ शकतो. त्यामुळे हा नवा माळशेज रेल्वे मार्ग ठाणे, पुणे व नगर या तिन्ही जिल्ह्यांतील शेतकºयांच्या विकासाचे नवीन पर्व घेऊन येणार असे वाटते आहे. तसेच हा मार्ग होण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील तसेच जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे यांनी पुढाकार घेऊन  हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मागणी होत आहे..........

तब्बल २२ वर्षांपासून काम रखडले सर्वेक्षणाचे कल्याण ते नगर काम पूर्ण पूर्णत: फायद्याचा मार्ग असल्याचा दावा माळशेज पट्ट्याच्या विकासाला तारक जुन्नरच्या पर्यटन विकासाला फायदा ठाणे, नगर, पुणे या तीन जिल्ह्यांना उपयुक्त  .......माळशेज रेल्वे धावू लागल्यास ठाणे, पुणे व नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांना दूरची बाजारपेठ नजीक उपलब्ध होणार आहे. 2यामुळे त्यांना उत्पन्नाचा नवीन पर्याय मिळणार आहे. शिवाय पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळणार असून पर्यटन क्षेत्रात जुन्नर तालुक्यात माळशेज रेल्वे क्रांती निर्माण करेल असा तज्ज्ञांकडून अंदाज वर्तविला जात आहे. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे