इतिहास घडेल तेव्हा हे सरकार पडेल : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:31+5:302020-12-08T04:11:31+5:30

इंदापूर शहरातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगल्याला केंद्रिय सामजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी ( दि. ७ ...

When history happens, this government will fall: Ramdas Athavale | इतिहास घडेल तेव्हा हे सरकार पडेल : रामदास आठवले

इतिहास घडेल तेव्हा हे सरकार पडेल : रामदास आठवले

इंदापूर शहरातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगल्याला केंद्रिय सामजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी ( दि. ७ ) धावती भेट दिली. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आरपीआयचे बाळासाहेब सरवदे, शिवाजीराव मखरे, संदीपान कडवळे, नितीन आरडे आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, केंद्र सरकार कृषी विधयकात बदल करण्यास तयार आहे. हे बिल केंद्राच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे या बिलात बदल करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. मात्र ते माघारी घेण्यात येणार नाही. आपल्या राज्यातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र, हरियाणा आणि पंजाब या दोनच राज्यातील शेतकरी दिल्लीच्या आंदोलनात सहभागी आहेत.

केंद्र शासनाने राज्याचे जीएसटीचे वीस हजार कोटी रुपये दिले पाहिजे असे राज्य सरकार म्हणत आहे. केंद्र सरकारने लवकरच पैसे दिले पाहिजे या मताचे आम्ही आहोत. सरकारकडे पैसे आले की त्यावेळी महाराष्ट्राला ते त्यांना द्यावेच लागणार आहेत.

चौकट :

तिन्ही पक्ष एकत्रित आल्याने राज्यात पदवीधर निवडणुकी भाजपाला निराशा

राज्यात यंदाच्या पदवीधर निवडणूका झाल्या. त्यामध्ये आम्हांला किमान तीन जागा निवडून येतील अशी अपेक्षा होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी त्याच बरोबर इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अतिशय चांगले काम केले. मात्र, विरोधी पक्षातून तीन पक्ष एकत्रित लढल्याने राज्यात पदवीधर निवडणूकीत भाजपाची निराशा झाली. पदवीधरांनी आम्हांला नाकारले नाही. पुढील वेळेस आम्ही आणखीन जोमाने काम करू.

- रामदास आठवले, केंद्रीय सामजिक न्यायमंत्री

फोटो ओळ : इंदापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय सामजिक न्यायमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवर

Web Title: When history happens, this government will fall: Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.