शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन सावधान; तुमच्यावर आहे पोलिसांचा 'वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 13:02 IST

गैरकृत्य करणाऱ्या सदस्यासोबत अ‍ॅडमिनलाही खावी लागेल जेलची हवा

ठळक मुद्देसमाजात तेढ निर्माण करणारा मेसेज गुन्हा

पुणे : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन असणे आता जबाबदारीचे होणार आहे. एखाद्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधून समाजात तेढ निर्माण करणारा मेसेज टाकला तर त्या अ‍ॅडमिनला आता जेलचीच हवा खावी लागणार आहे. व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफवा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला  आहे. कोरोना विषाणू उद्रेकानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात  आले आहे. मात्र, मोकळ्या वेळेत काही विघ्नसंतोषींकडून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अफवा पसरविल्या जात असल्याचे दिसून आले आहे. त्यावर आता पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. सायबर गुन्हा म्हणून याची नोंद होणार आहे. वादग्रस्त आणि अफवा पसरविणारे मेसेज रोखणे ही आता व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनचीच जबाबदारी असणार आहे. आता केवळ ग्रुप तयार करून अ‍ॅडमिन म्हणून मिरविण्याचे दिवस गेले आहेत़ अ‍ॅडमिन होण्याबरोबरच आता मोठी जबाबदारीही अंगावर येऊन पडली आहे़ त्याकडे दुर्लक्ष केल्यास गजाआड जाण्याची वेळ  येऊ शकते़.......अफवा टाळण्यासाठी एका वेळी एकाच  ग्रुपवर पाठविता येणार मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर पसरणाºया अफवा टाळण्यासाठी खूप जास्त फॉरवर्ड होणाºया मेसेजला ह्यडबल अ‍ॅरोह्ण चा मार्क येणार आहे. हा मार्क असलेला मेसेज एका वेळी एकाच ग्रुपवर पाठविता येईल. कोरोना विषाणूसंदर्भात पसरवल्या जात असलेल्या अफवा रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप कंपनीद्वारेच हा निर्णय घेण्यात आला  आहे. काही मेसेजेस अनेक ग्रुपवर पाठवून त्याद्वारे अफवा पसरविल्या जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ........* कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर धर्म, राष्ट्रीयत्व, वंश, भाषा इत्यादी कारणांनी वैरभाव वाढवू शकेल, अशी कोणतीही पोस्ट पाठविता येणार नाही. देशद्रोही, जातीयवादी किंवा वर्णद्वेष पसरविणारे मेसेज टाकल्यास तो गुन्हा होणार आहे. .............* व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनलाच आपल्या ग्रुपमधील सदस्यांना लगाम घालावा लागणार आहे. ग्रुपमधील सदस्यांकडून असा प्रकार घडल्यास पोलिसांना कळविणे हे त्याचे कर्तव्य असणार आहे. कोणाचीही बदनामी होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. ........* सोशल मीडिया नेटवर्किंग साइट्सवर काहीही टाकले तरी आपण वाचू शकतो, असे अनेकांना वाटते. याचे कारण यातून ओळख उघड होत नाही, असे वाटते. मात्र, इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे पुरावे गोळा करणे शक्य असते. त्यामुळे गैरकृत्य करणाºयांना शोधून शिक्षा करता येणे पोलिसांसाठी सोपे होणार आहे. ............* कोणाच्या परवानगीशिवाय फोटो काढणे आणि ती व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पसरविणे हादेखील गुन्हा ठरणार आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फोटो काढणे टाळायला हवे. तसेच एखाद्याचा फोटो डीपी म्हणून ठेवणेदेखील बेकायदा असणार आहे. ............

* व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन, ही काळजी घ्याच1 - व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनने आपल्या ग्रुपमधील प्रत्येक सभासद हा विश्वासार्ह आहे, ही काळजी घेण्याची गरज आहे. 2- गैर वागणाऱ्या सदस्यांबाबत पोलिसांना त्वरित माहिती देण्याची गरज आहे. 3-व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनने आपल्या गु्रपमधील सर्व सदस्यांना यासंदर्भातील कायदा आणि नियमांची माहिती द्यायला हवी.  तसा मेसेज ग्रुपवर टाकायला हवा. 4- अ‍ॅडमिनने सातत्याने ग्रुपवर काय प्रकारचा मजकूर प्रसारित होत आहे, याची काळजी घ्यायला हवी. ...............

कायदा काय सांगतो भारतीय दंडविधानसंहिता (इंडियन पिनल कोड-  आयपीसी) १५३ ए नुसार धर्म, जात, वंश, भाषा, जन्म ठिकाण, रहिवासाचे ठिकाण आदींवरून समाजात तेढ निर्माण होईल, वैरभाव निर्माण होईल आणि त्यातून समाजाच्या एकोप्याला तडा जाईल, असे मेसेज पाठविणे गुन्हा आहे. या प्रकारच्या गुन्ह्यासाठी तीन ते पाच वर्षे कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. 

टॅग्स :PuneपुणेWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस