शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल सत्तारांचं कराययं काय? खाली डोकं वर पाय...! सिंहगड रस्त्यावर जोडे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 15:00 IST

खडकवासला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अब्दुल सत्तारांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध

धायरी : अब्दुल सत्तरचं कराययं काय ? खाली डोकं वर पाय... अशा घोषणा देताना खडकवासला राष्ट्रवादी युवकच्या वतीने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध नोंदविला. सुप्रिया सुळे यांच्याबाबत मुक्ताफळे उधळणारे राज्याचे कृषी मंत्री यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. खडकवासला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरद दबडे यांच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर पुलाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी अपमानकारक शब्द वापरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा त्वरित राजीनामा घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबकअण्णा मोकाशी, दिलीप बराटे, शुक्राचार्य वांजळे, सायली वांजळे, अनिता इंगळे, स्वाती पोकळे, भूपेंद्र मोरे, सुप्रिया भूमकर, कुणाल पोकळे, नुर सय्यद, चंद्रशेखर पोकळे  तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष शरद दबडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

राष्ट्रवादीच्या आंदोलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी... 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते. यामुळे खडकवासला मतदार संघातील राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यातील ताळमेळ अधोरेखित होत आहे. त्याबरोबरीने भारतीय काँग्रेसचे देखील काही पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे तिन्ही पक्षांनी मिळून यावेळी अब्दुल सत्तार यांचा निषेध केला, अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये रंगली.

टॅग्स :DhayariधायरीagitationआंदोलनPoliticsराजकारणAbdul Sattarअब्दुल सत्तारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस