शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात महिलांसाठी नेमकं काय.....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 8:00 PM

शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविण्याच्या उद्देशाने राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना अशा विविध योजना महिलांसाठी प्रस्तावित केल्या आहेत. 

पुणे: महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये अल्प दरात महिलांची कर्करोगाची तपासणी, महिला व युवतींना स्वसंरक्षण, स्वावलंबन आणि समुपदेशनची सुविधा देणे, आयटी शहरात महिलांची राहण्याची अडचण लक्षात घेऊन महिलांसाठी वसतिगृह, महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविण्याच्या उद्देशाने राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना अशा विविध योजना महिलांसाठी महापालिकेच्या सन २०१९-२० च्या अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित केल्या आहेत. .......................-महिलांसाठी कर्करोग निदान चाचणी : १ कोटी तरतुदपुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात १९ प्रसूतिगृहे चालविली जातात. महापालिकेच्या सर्व १९ प्रसूतिगृहांमध्ये स्मार्ट स्कोप हे कर्करोगाचे निदान करणारे उपकरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना ही सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहे. ................-महिलांसाठी वसतिगृह : २ कोटीची तरतुद शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परगावांहून पुण्यात येणाºया महिला आणि युवतींची संख्या मोठी आहे. कळस-धानोरी परिसरात महापालिकेच्या वतीने विद्यार्थिनी आणि नोकरी करणा-या महिलांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. ...............-राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना : २ कोटी ५० लाख महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविण्याच्या उद्देशाने राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत महिला व युवतींसाठी स्वसंरक्षण, स्वावलंबन आणि समुपदेशन या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. महिला व युवतींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि त्यांना स्वसंरक्षण करता यावे यासाठी ज्यूदो, कराटे, लाठी-काठी, योगासने व व्यायाम शिकविले जाणार आहेत.पौगांडावस्थेतील मुली, युवती, विवाहित महिला यांच्या विविध समस्या व प्रश्न, कौटुंबिक सल्ला, महिलांचे अधिकार, कायदे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.............. -मागासवर्गीय समाजातील महिलांसाठी स्वयंरोजगार : पुरेशी तरतुदमागासवर्गीय समाजातील महिलांना स्वयंरोजगारासाठी उद्योग-व्यवसाय सुरू करता यावा यासाठी कौशल्य प्रशिक्षण, उद्योग-व्यवसाय प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, भांडवल उभे करणे, अल्प दरात कर्ज मिळविणे, विविध प्रकारच्या उद्योग, ववसाकि समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करणे यासाठी उद्योग व्यवसायाबाबतचे संगोपन (इनक्युबेशन) केंद्र सुरू करण्यात येणार आहे.  ......................- महिल्यांच्या स्वच्छतागृहांकडे दुर्लक्षच....स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी आपल्य सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात महिलांच्या काही योजनांना प्राधान्य दिले असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून अपु-या स्वच्छतागृहाची समस्या दूर करण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये फारचा विचार केलेला दिसत नाही. शहरामध्ये आजही महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न अत्यंत गभीर आहे. अपुरी संख्या अत्यंत अस्वच्छ व दयनीय आवस्थेतील स्वच्छतागृहामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. परंतु महिलांच्या स्वच्छतागृहाची संख्या वाढविण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये फारसे काही करण्यात आले नाही. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBudget 2019अर्थसंकल्प 2019Womenमहिला