शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे तिथे काय उणे! रंगाचा वास येतो म्हणून चित्रकार दाम्पत्याला महापालिकेची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 17:03 IST

महापालिकेचा प्रताप : शेजाऱ्याने दिली होती पालिकेकडे तक्रार

ठळक मुद्देपालिकेच्या या पावित्र्याने आश्चर्यचकित झालेल्या दाम्पत्याने नोटीशीविरोधात उठविला आवाज

पुणे : महापालिकेच्या कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाकडून कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या एका चित्रकार दाम्पत्याला नोटीस बजावली असून चित्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांचा वास येत असल्याचे कारण नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. या दाम्पत्याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने पालिकेकडे याबाबत तक्रार केली होती. या दाम्पत्याने या नोटीसीविरुद्ध आवाज उठवताच पालिकेने नोटीस मागे घेतली.

अनामिक आणि कृष्णा कुचन असे या दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघेही कर्वेनगर भागात भाड्याच्या घरात राहतात. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे त्यांनी आपला संसार स्टुडिओत मांडला. त्यांच्या समोर राहणाऱ्या एका कुटुंबाने रंगांचा वास येत असल्याची तक्रार पालिकेकडे केली होती. पालिकेनेही पडत्या फळाची आज्ञा मानत  सतर्कता   दाखविली.  कूचन यांच्या घरी पाहणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनी विचारपूस न करता थेट नोटीसच बजावली.  पंखा लावून वास घालवा आणि व्यावसायिक काम घरात हलवा असा सल्ला दिला. 

पालिकेच्या या पावित्र्याने आश्चर्यचकित झालेल्या या दाम्पत्याने  या नोटीशी विरोधात आवाज उठवत विरोध केला. पालिकेला आपली चूक कक्षात आल्यानंतर पालिकेने नोटीस मागे घेतली. गेले दोन महिने हे दाम्पत्य पालिकेच्या नोटीसीला विरोध करीत होते. चित्रकारांनी कुठे चित्र काढायचे हे महापालिका ठरवणार का असा सवाल या दाम्पत्याने केला आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाpaintingचित्रकला