शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! पुण्यातही घडलं होतं ‘पेगासस’, पत्नीची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी पतीनं केला हा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 13:27 IST

इस्त्रायली तंत्रज्ञान असलेल्या पेगासस या सॉफ्टवेअरने सध्या जगभर धुराळा उडविला आहे

ठळक मुद्देपत्नीला मोबाईल भेट देऊन त्यामध्ये स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर नावाचे अ‍ॅप ठेवले होते

पुणे : आपल्या विरोधकांची माहिती मिळविण्यासाठी इस्त्रायली तंत्रज्ञान असलेल्या पेगासस या सॉफ्टवेअरने सध्या जगभर धुराळा उडविला आहे. भारतातही विरोधकांच्या मोबाईलमध्ये हे सॉफ्टवेअर टाकून राजकीय नेत्यांपासून पत्रकारांपर्यंत अनेक लोकांची माहिती सरकारने गोळा गेल्याचा वाद सध्या गाजत आहे. मात्र, पुण्यातील एका पतीने आपल्या पत्नीची माहिती मिळविण्यासाठी अशाच प्रकारचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाआहे.

सायबर तज्ञाच्या मदतीने याचा छडा कोथरुड पोलीस लावणार आहेत. याप्रकरणी कोथरुडमधील शिवतीर्थनगरमध्ये राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली बाणेर येथील ३७ वर्षाच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बाणेर आणि कोथरुडमध्ये २३ डिसेंबर २०१३ पासून ५ मे २०१७ दरम्यान  घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी आणि आरोपी हे दोघे पतीपत्नी आहेत. फिर्यादी यांच्याकडे त्यांचे पती वारंवार पैशांची मागणी करीत असत. त्यावरुन त्यांच्या वाद होत होते. पती फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत असत.

त्यावरुन त्यांना शिवीगाळ व मारहाण करीत. फिर्यादी यांना त्यांच्या पतीने २०१३ मध्ये एक मोबाईल भेटदिला होता. या मोबाईलमध्ये स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर नावाचे अ‍ॅप अगोदर डाऊनलोड करुन ठेवण्यात आले होते. या अ‍ॅपद्वारे त्यांची सर्व गोपनीय माहिती परस्पर आरोपी पतीने त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक लॅपटॉप व मोबाईलमध्ये घेऊन त्याचा गैरवापर केला. पती पत्नी हे दोघेही आता वेगळे राहतात. याबाबत कोथरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडे यांनी सांगितले की, पती पत्नीमधील हा वाद असून मोबाईलमधील सॉफ्टवेअरमार्फत गोपनीय माहिती काढून घेतल्याची पत्नीची फिर्याद आहे. याबाबत सायबर तज्ञांची मदत घेऊन याचा छडा लावण्यात येणार आहे.

पेगासस काय आहे आणि कशाप्रकारे काम करतं?

पेगासस एक सर्व्हेलन्स सॉफ्टवेअर आहे जे इस्रायलची सुरक्षा कंपनी एनएसओ ग्रुपने बनवलं आहे. हे सॉफ्टवेअर वापरून कोणत्याही व्यक्तीचा फोन हॅक केला जाऊ शकतो आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येऊ शकतं. ज्या फोनला लक्ष्य करायचं आहे त्या फोनमध्ये हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जातं. एकदा का ते सॉफ्टवेअर कार्यान्वित झालं की, त्यामुळे फोनचा रिमोट अँक्सेस मिळतो, म्हणजेच फोनच्या जवळ न जाताही त्यातले कॉल लॉग, कॉन्टॅक्ट, मेसेज यांच्यावर लक्ष ठेवता येतं.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकcyber crimeसायबर क्राइम