शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मुख्यमंत्री अाणि इतर मंत्र्यांमध्ये काय संभाषण झाले हे तपासणे अावश्यक : अॅड प्रकाश अांबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 20:51 IST

मुख्यमंत्री अाणि इतर मंत्र्यांमध्ये काय संभाषण झाले हे तपासणे अावश्यक अाहे असे त्यामुळे त्यांना चाैकशी अायाेगासमाेर बाेलविण्यात यावे असे अॅड प्रकाश अांबेडकर यांनी अायाेगासमाेर सांगितले.

पुणे : काेरेगाव भिमा येथे दंगल झाल्यानंतर ज्यां मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना फाेन केला, त्यांच्यात अाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काय अाणि किती वाजता संभाषण झाले तसेच मंत्र्यांचा फाेन अाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काेणते अादेश दिले हे तापसून पाहण्याची गरज असल्याचे अॅड प्रकाश अांबेडकर यांनी चाैकशी अायाेगाला सांगितले.        कोरेगाव भिमा दंगलप्रकरणी चौकशी आयोग नियुक्त करण्यात आला असून कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मल्लिक यांची द्विसदस्यीय कोरेगाव भिमा प्रकरणी चौकशी करत आहे. आयोगाच्या दुस-या टप्प्यातील कामाला सुरूवात झाली असून कामकाजाच्या दुस-या दिवशी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष म.ना.कांबळे यांच्या वतीने आयोगासमोर बाजू मांडली. दंगल प्रकरणी कोण गुन्हेगार आहेत आणि दंगल कोणी घडवली हे शोधण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस व शासकीय अधिका-यांचा जबाब नोंदवून घेणे गरजेचे असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.

     आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भिमा येथे दंगल झाल्यानंतर ज्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला. त्यांच्यात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काय आणि किती वाजता संभाषण झाले. मंत्र्यांचा फोन आल्यावर मुख्यमंत्र्यांनी कोणते आदेश दिले.तसेच जर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले नसतील तर तो वेगळाच मुद्द ठरतो.त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर संबंधित अधिका-यांनी ते आमलात आणले किंवा नाही.हे सुध्दा पाहण्याची गरज आहे.त्यामुळे शासकीय यंत्रणा अकार्यक्षम ठरली; हे निश्चित करण्यासाठी या सर्व बाबी आवश्यकता आहे. अकार्यक्षमता समोर आणण्यासाठी शासकीय यंत्रणे बरोबरच मुख्यमंत्री हे सुध्दा आयोगासमोर हजर राहिले पाहिजेत.तसेच या घटनेशी निगडीत कागदपत्र पोलिसांनी आयोगाकडे सादर केले तर आयोगाला अधिक चांगल्या पध्दतीने काम करता येईल,असे नमूद करून आंबेडकर म्हणाले, या प्रकरणात लेखी व तोंडी संभाषण आयोगासमोर यायला हवे. त्याचप्रमाणे दरम्याच्या काळातील घटनाक्रम पाहिला पाहिजे. त्यात 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळातील घटना आणि 1 जानेवारी नंतरची स्थिती तसेच एल्गार परिषद म्हणजे काय ? हे समजून घेतले पाहिजे. 

         महसूली अधिका-यांनी कोरेगाव भिमा प्रकरणासंदर्भातील काही माहिती पोलिसांना दिली होती. त्यासंदर्भातील पुरावे आयोगाकडे आहे. मात्र,प्रथम महसूल अधिकारी,पोलीस अधिकारी यांचा जबाब नोंदवून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र,कोणत्या अधिका-यांचा जबाब नोंदवून घ्यावा, याचा क्रम ठरविण्याचे सर्व अधिकार आयोगाचे आहेत, असेही आंबेडकर म्हणाले.मुंबई येथे याबाबत होणा-या सुनावणीत पुढील बाजू मांडणारग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले अ‍ॅफिडेविट,तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या सभागृहात दिलेले निवेदन, ग्रामीण व शहरी भागातील पोलिसांना देण्यात आलेले अधिकार आणि त्यानंतर त्यांनी सादर केलेले अ‍ॅफिडेविट याबाबतची माहिती समोर येत नाही. तोपर्यंत जबाबदारी निश्चित होत नाही. मुंबई येथे याबाबत होणा-या सुनावणीत पुढील बाजू मांडणार आहे,असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

‘रुल आॅफ बुक’नुसार सरकारी अधिका-यांची प्रथम सुनावणी झाली पाहिजेआंबेडकर म्हणाले,आयोगाकडे ज्या व्यक्ती संघटनांनी प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. त्यांची प्रथम साक्ष नोंदवून घेणे व उलट तपासणी घेण्याची आयोगाची भूमिका अशी आहे. मात्र,‘रुल आॅफ बुक’नुसार सरकारी अधिका-यांची प्रथम सुनावणी झाली पाहिजे. त्यानंतर प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या व्यक्तींची सुनावणी घ्यावी,अशी वकिलांची मागणी आहे. पुढील सुनावणी मुंबई येथे होणार आहे.त्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस