Pune: पाेहायला गेला अन् कॅनॉलमध्ये बुडाला, बी. टी. कवडे रोड परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 09:32 IST2024-03-26T09:31:24+5:302024-03-26T09:32:11+5:30
ही घटना बी. टी. कवडे रोड येथील कॅनॉलमध्ये रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली...

Pune: पाेहायला गेला अन् कॅनॉलमध्ये बुडाला, बी. टी. कवडे रोड परिसरातील घटना
पुणे : मित्रांबरोबर कॅनॉलमध्ये पोहायला गेलेला १४ वर्षांचा मुलगा वाहत जाऊन बुडाला. ही घटना बी. टी. कवडे रोड येथील कॅनॉलमध्ये रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. पारस सचिन प्रसन्ना (वय १४, रा. घोरपडी गाव) असे मृत मुलाचे नाव आहे.
पारस हा मित्रांबरोबर होळीच्या दिवशी रविवारी कॅनॉलमध्ये पोहायला गेला होता. पाणी कमी असल्याने तो पाण्यात उतरला. परंतु, पोहता येत नसल्याने तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. मुलांनी आरडाओरडा करून लोकांना बोलविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात शोध घेतला. परंतु, तो सापडला नव्हता. सोमवारी दुपारी हडपसर येथील शिंदे वस्ती कॅनॉल येथून त्याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला.