शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

यंदा लोकप्रतिनिधींच्या निधीतून होणार पालख्यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 3:12 PM

आषाढी वारी निमित्ताने पुण्यात येणाऱ्या वारक-यांचे स्वागत लोकसहभागातून व लोकप्रतिनिधींच्या निधीतून करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देन्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पालिकेचा निधी वारक-यांच्या स्वागतासाठी केला जाणार नाही.पालखी मार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणात निधीवारीनिमित्ताने सतर्क राहण्याच्या सूचना पर्यावरणाच्या रक्षणासाठी वारीच्या मार्गावर प्लास्टिक वापरावर निर्बंध

पुणे: आषाढी वारी निमित्ताने पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात दाखल होणा-या पालख्यांचे स्वागत पालिकेच्या निधीतून नाहीतर लोकप्रतिनिधींच्या निधीतून केले जाणार असल्याचे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी जाहीर केले. त्यामुळे वारक-यांचे स्वागत लोकसहभागातून व लोकप्रतिनिधींच्या निधीतून करण्यात येणार आहे.   पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीच्या पूर्व तयारीची बैठक विधान भवन येथे घेण्यात आली.आषाढी वारीनिमित्ताने महाराष्ट्रातील कानाकोप-यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात. या वारक-यांना केंद्रबिंदू मानून आषाढी वारीची तयारी करण्याच्या सूचना बापट यांनी दिल्या. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, साता-याचे पालकमंत्री विजय शिवतारे, पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे,तीनही जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पुणे मनपाचे आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता प्रवीण कीडे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे-पाटील, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा प्रमुखांसह विविध दिंड्यांचे प्रमुख  या बैठकीस उपस्थित होते.न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पालिकेचा निधी वारक-यांच्या स्वागतासाठी केला जाणार नाही. त्यामुळे स्थानिक खासदार,आमदार, नगरसेवक स्वत:च्या खर्चातून वारक-यांसाठी स्वागत कक्ष उभारले जातील. तसेच लोकसहभागातून निधी उभारून नागरिकांना आवश्यक बाबी पुरविल्या जातील,असे बापट यांनी या बैठकीत स्पष्ट केल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.पालखी मार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे या कामाला गती देण्यासाठी तिन्ही जिल्ह्यातील अधिका-यांनी भूसंपादनाची कामे वेगाने करावीत. भूसंपादन करताना बाधित शेतक-यांना योग्य व तातडीने मोबदला देण्यात यावा,अशा सूचना बापट यांनी दिल्या.तसेच आळंदी-देहू मार्गाच्या दुरूस्तीचे काम तातडीने करून घ्यावे. पालखी मार्गावरील रस्त्याच्या दूरूस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घ्यावीत. त्याचप्रमाणे पालखी तळांच्या ठिकाणी सपाटीकरण करून तात्पुर्त्या स्वरूपात पुरेशा प्रमाणात शौचालये उभारण्यात यावीत. पालखी तळाच्या ठिकाणी पुरेशा पाण्याची व वीजेची सोय करण्यात यावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वारीच्या मार्गावर प्लास्टिक पत्रावळ्या, ग्लास, पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणावेत, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी,असेही बापट यांनी सांगितले..........................वारीनिमित्ताने सतर्क राहण्याच्या सूचना वारीच्या कालावधीत वारकरी व भाविकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने सर्व पाण्याचे उदभव तपासण्यात यावेत. तसेच आरोग्य विभागाने सर्व ठिकाणी सज्ज राहण्याच्या सूचना बापट यांनी यावेळी दिल्या. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस विभागाने सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका