शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचा होणार कायापालट, सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 16:11 IST

पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मुकूटमणी असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराने नुकतीच सुवर्णमहोत्सवी मजल मारली आहे. शहरातील सांस्कृतिक वैविध्य, शहराला प्राप्त झालेले आंतरराष्ट्रीय महत्व, सांस्कृतिक उपक्रमांची जोमदार वाढ या सा-या बाबी लक्षात घेऊन महापालिकेच्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे : पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मुकूटमणी असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराने नुकतीच सुवर्णमहोत्सवी मजल मारली आहे. शहरातील सांस्कृतिक वैविध्य, शहराला प्राप्त झालेले आंतरराष्ट्रीय महत्व, सांस्कृतिक उपक्रमांची जोमदार वाढ या सा-या बाबी लक्षात घेऊन महापालिकेच्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती करुन सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सर्व कलांना सामावून घेणारे अ‍ॅम्फीथिएटर, बालकलाकारांसाठी थिएटर, कार्यक्रमांची रंगीत तालीम असे वैविध्य निर्माण होणार असल्याने सांस्कृतिक क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.खुर्च्यांची अवस्था, अस्वच्छता, स्वच्छतागृहांमधील गायब झालेले नळ, फुटके आरसे, राजकीय कार्यक्रमांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना लावली जाणारी कात्री, कलादालनातील असुविधा, गैरसोय यामुळे गेल्या काही काळापासून बालगंधर्व रंगमंदिर वादाच्या भोव-यात सापडले आहे. सुविधांची वानवा कलावंतांनी, प्रेक्षकांनी वारंवार प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. त्याबाबत अनेकदा पाहणीही करण्यात आली. कलाकारांच्या खोल्या, कलादालन, ध्वनिव्यवस्था, बैठकव्यवस्था, स्वच्छतागृहे अशा सुविधांच्या माध्यमातून वर्षभरात रंगमंदिराचा कायापालट केला जाणार आहे, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सादर झालेल्या महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात तज्ज्ञांची समिती नेमून, सविस्तर अहवाल तयार करुन रंगमंदिराच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्याची तरतूद करण्यात आली आहे.अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, बालगंधर्व रंगमंदिराचे जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त थिएटरमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. विविध आकारांची आणि वैशिष्ट्यांची सुसज्ज थिएटर्स, मुबलक पार्किंग, मनोरंजनाच्या सुविधा यांचा समावेश होऊन बालगंधर्व केवळ पुण्याचेच नव्हे, तर देशातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र होण्याच्या उद्देशाने पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी तज्ज्ञांचा समावेश असणारी समिती नियुक्त करुन तिला सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात येणार आहे.संवाद, पुणेचे सुनील महाजन म्हणाले, ‘गोव्याच्या कला अकादमीच्या धर्तीवर बालगंधर्व रंगंमदिराचा कायापालट होऊ शकतो. लहान मुलांसाठी थिएटर, अ‍ॅम्फीथिएटर अशा माध्यमातून रंगमंदिराचा विकास साधता येऊ शकतो. पुण्यामध्ये अनेक सभागृहे पांढ-या हत्तींप्रमाणे पोसली जात आहेत. त्यामुळे कल्पना चांगली असली तरी ती व्यवस्थित अमलात आणणे गरजेचे आहे. रंगमंदिराचे नाव कायम ठेवून या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी.’

बालगंधर्व रंगमंदिर ही पुण्याची शान आहे. हा वारसा कायमस्वरुपी जतन करायचा असेल तर त्यासाठी पुनर्विकासाची योजना स्वागतार्ह आहे. रंगमंदिराच्या उभारणीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगीत तालीम, सांगितिक कार्यक्रम, एकपात्री प्रयोग अशा प्रयोगांसाठी वेगवेगळे छोटेखानी सभागृह बांधता येऊ शकेल. रंगंदित अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज झाल्यास जागतिक पातळीवरील कार्यक्रमही येथे सादर होऊ शकतात. बालगंधर्वला जगविख्यात थिएटरचे रुप द्यायचे असेल तर १० कोटी रुपयांचा निधी अपुरा पडेल, असे वाटते.- मोहन कुलकर्णी, मनोरंजन, पुणे

टॅग्स :Puneपुणे