शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

Weather Alert! श्रीवर्धन, मालवणला अतिवृष्टी; पुढील २ दिवस राज्यात अनेक ठिकाणी 'वरुणराजा' बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 21:10 IST

श्रीवर्धन, मालवण येथे अतिवृष्टी झाली असून पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला.

पुणे : मध्य पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण कोकणपर्यंत असलेले द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण अरबी समुद्र ते दक्षिण कोकणपर्यंत पसरले असल्याने कोकणात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. श्रीवर्धन, मालवण येथे अतिवृष्टी झाली असून पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचवेळी मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पेरण्यांसाठी अधिक पावसाची अपेक्षा आहे.

गेल्या २४ तासात श्रीवर्धन २१०, मालवण १९०, सावंतवाडी १७०, वैभववाडी १६०, देवगड, मुरुड, पेडणे १५०, कणकवली १४०, गुहागर, वाल्पोई, वेंगुर्ला १३०, दोडामार्ग, सांगे १२०, मुळदे, राजापूर, रत्नागिरी, रोहा ११०, दाभोलीम, खेड, म्हापसा, मडगाव, मार्मागोवा, म्हसळा, फोंडा १०० मिमी पावसाची नोंद झाली होती. याबरोबरच कोकणात सर्व दूर जोरदार पाऊस झाला आहे.

मध्य महाराष्ट्रात गगनबावडा १७०, आजारा १६०, चांदगड ९०, राधानगरी ८०, गडहिंग्लज ७०, महाबळेश्वर ६० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यात जळकोट ५०, कैज ४०, चाकूर, रेणापूर ३० मिमी पाऊस पडला.

विदर्भात वाशिम ५०, दिग्रस, मालेगाव, मंगळूरपीर, मानोरा ४० मिमी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. घाटमाथ्यावरील कोयना (पोफळी) ७०, अम्बोणे ५०, ताम्हिणी ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात बुधवारी दिवसभरात महाबळेश्वर ४५, कोल्हापूर ४५, सातारा १३, सांगली ६, मुंबई ९९, सांताक्रूझ २४, अलिबाग ३७, रत्नागिरी ५२, पणजी ४७, डहाणु ३, परभणी २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. या दोन जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातार्‍यातील घाट परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाही. तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

........पुण्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे शहरात आज दिवसभरात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या. मात्र, त्यात जोर नव्हता. पुणे शहरात पुढील चार दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानMonsoon Specialमानसून स्पेशल