शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

Weather Alert : पुढील तीन दिवस पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 22:18 IST

गेले काही दिवस दिवसाच्या कमाल तापमानात घट झाली असतानाच रात्रीच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे.

पुणे : मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळला आगमन होणार असल्याचा सांगावा हवामान विभागाने नुकताच दिला असताना आज पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रात पूर्वमौसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे शहर व परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत कोसळत होता. रात्री साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे २४ मिमी तर लोहगाव येथे ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

गेले काही दिवस दिवसाच्या कमाल तापमानात घट झाली असतानाच रात्रीच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली होती. त्याचा परिणाम आज दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी होऊन सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता. अर्ध्या तासानंतर पावसाचा जोरही कमी झाला. साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे २.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. काही वेळानंतर पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या.

दक्षिण पूर्व मध्य प्रदेश व लगतच्या भागापासून ते दक्षिण तामिळनाडुपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 

पुणे शहर व परिसरात आकाश सायंकाळनंतर ढगाळ राहून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणार असाल व सायंकाळी परत येणार असाल तर बरोबर छत्री अथवा रेनकोटजवळ बाळगण्याची दक्षता घ्यावी.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसTemperatureतापमानMaharashtraमहाराष्ट्र