शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्र्रात विधानसभेला २०० च्या वर जागा जिंकू! कार्यकर्त्यांनो घरोघरी जाऊन काम करा

By श्रीकिशन काळे | Updated: July 21, 2024 12:52 IST

फिरसे जितने का हौसला रखते है हम...! चंद्रशेखर बावनकुळे यांचा आत्मविश्वास

पुणे: येत्या निवडणुकीत विधानभवनावर भगवा फडकावायचा असेल, तर सर्वांनी घरोघरी जाऊन काम करावे. आपल्याला दोनशेच्यावर जागा मिळतील. मला घमंड नाही, तर आत्मविश्वास आहे. प्रत्येक बुथवर दहा मते वाढवा, आपला विजय निश्चित आहे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन बालेवाडीत आज सुरू आहे. त्यावेळी बावनकुळे यांनी प्रास्ताविक केले आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरचिटणीस विनोद तावडे, पियूस गोयल आदी पदाधिकारी उपस्थित आहेत. 

बावनकुळे म्हणाले, लोकसभेला आपल्याला अनेक जागांवर पराभव स्वीकारावा लागला. पण मतांची आकडेवारी पाहिली तर थोड्या मतांनी आपल्या अनेक जागा गेल्या. आता विधानसभेला प्रत्येक बुधवर दहा मते वाढविली तर आपला विजय निश्चित आहे. विधनसभेत आपल्याला चांगले यश मिळेल. विरोधकांनी खोटेपणा करून लोकसभेत आपल्याला पराभूत केले. पण आता त्या पराभवातून आपण शिकलो आहोत. त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे. खरंतर मराठा समाजासाठी देवेंद्रजींनी रात्ररात्रं काम केलं आहे. मराठ्यांना आरक्षण दिले तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत. आज आंदोलन करताना देवेंद्रजी यांना टार्गेट केले जात आहे. मराठा आरक्षणाला आम्ही पाठिंबा देतोय. देवेंद्रजी यांनी जो कायदा केला, त्याचा मारेकरी शोधा. 

ओबीसीचे गेलेले काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी यांनी केले. निवडणुका झाल्या नाहीत, ते कोणामुळे थांबल्या. महाविकास आघाडीने पंचायत समितीच्या निवडणुका रोखल्या. गरीब कल्याण योजना ठाकरे सरकारने बंद केली. हे पाप ठाकरे सरकारने केले. ज्या दिवशी सरकार आले तेव्हापासून विकासाची २०-२० मॅच सुरू झालीय. 

उद्याचे महाविकास आघाडीला मत म्हणजे मोदींच्या योजना थांबविण्यासाठी असेल. म्हणून १४ कोटी जनतेला माझे आवाहन आहे की, असे करू नका. योजना बंद करू नका. आज घरोघरी जाऊन मोदी सरकारचे काम सांगायला हवे. लोकप्रिय योजना पुढे नेण्यासाठी काम करायचे आहे. मनात निराशा ठेवू नका. सर्वांनी नेटाने काम करावे. आपले नेते दणकट आहेत. कार्यकर्ता हा आपला श्वास आहे. इथून गेल्यावर प्रत्येक बुथवर जाऊन काम करायचे आहे. मतदार नोंदणी सुरू आहे.

आपण पदासाठी काम करत नाही. महायुतीचा निर्णय होईल. कोण लढेल ते वरिष्ठ ठरवतील. पण आपल्याला पक्षासाठी काम करायचे आहे. चार महिने पक्षावर, नेतृत्वावर श्रद्धा ठेवा आणि काम करा. या निवडणुकी आपण शिकलोय आणि पुढच्या निवडणुकीत जिंकणार आहोत. फिरसे जितने का हौसला रखते है हम, असा आत्मविश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेPoliticsराजकारणBJPभाजपाMahayutiमहायुतीSocialसामाजिक